ETV Bharat / state

वाढीव वीज बिलाविरोधात शेकापची महावितरण कार्यालयावर धडक.. - शेकापची महावितरण कार्यालयावर धडक

उलवे व नवी मुंबई परिसरात अव्वाच्या सव्वा वाढीव वीजबिले येत आहेत. वीज बिलं भरूनही वाढीव बिले आल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. यामुळे शेकाप आक्रमक झाली असून, वाढीव बिलाच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

Shetkari Kamgar Paksh protest against MSEDCL for increased electricity bill in navi mumbai
वाढीव विज बिलाच्या विरोधात शेकापची महावितरण कार्यालयावर धडक......
author img

By

Published : Aug 2, 2020, 8:43 PM IST

नवी मुंबई - उलवे व नवी मुंबई परिसरात अव्वाच्या सव्वा वाढीव विजबिले येत आहेत. वीज बिलं भरूनही वाढीव बिले आल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. यामुळे शेकाप आक्रमक झाली असून, वाढीव बिलाच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर शेकापच्या माध्यमातून धडक मोर्चा काढण्यात आला.

वाढीव वीज बिलांविरोधात राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या उलवे येथील कार्यालयावर शेकापने धडक दिली. महावितरण कंपनीकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत शेकापने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. ग्राहकांना सुधारित वीज बिले पाठवावी तसेच ग्राहकांचा वीज पुरवठा कोणत्याही प्रकारे खंडित करू नये, अशी मागणी यावेळी शेकापकडून करण्यात आली. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तसेच ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करणार नसल्याचे आश्वासन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी शेकापच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.