ETV Bharat / state

Sexual Assault With Dog : धक्कादायक! सिक्युरिटी केबिनमध्ये सुरक्षा रक्षकाचाच भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार - कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार

Sexual Assault With Dog : हायप्रोफाईल सोसायटीमधील स्कूलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय विकृतानं सिक्युरिटी केबिनमध्येच भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार (Sexual Assault with Animal) केल्याची (cruelty with animals) धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोसायटीमधील एका २१ वर्षीय विद्यार्थाच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकावर अत्याचारासह प्राण्यांची छळवणूक केल्याच्या (Malpractice by security guard) कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. रामजस जयकरण सिंह (वय 30, रा. माणकोली, भिवंडी) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे.

Sexual Assault With Dog
सुरक्षारक्षक फरार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 7:16 PM IST

Updated : Oct 7, 2023, 7:32 PM IST

ठाणे Sexual Assault With Dog : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नमन इंदाप (वय २१) हा शिक्षण घेत असून तो भिवंडी तालुक्यातील माणकोली येथील ग्रीन व्हेल या हायप्रोफाईल सोसायटीत राहतो. तर विकृत रामजस हा माणकोली गावातील पांडुरंग सोसायटीत राहतो. तो हायप्रोफाईल सोसायटीच्या लगतच असलेल्या एका स्कूलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यातच ५ ऑक्टोबरला स्कूलच्या गेटवर रात्रपाळीला आला होता. त्यावेळी या विकृत रामजस यानं रात्री साडेअकराच्या सुमारास सिक्युरिटी कॅबिनमध्येच भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केला. हे कृत्य नमननं पहिलं. त्यावेळी आरोपी रामजसनं कॅबिनमधून कुत्र्याला सोडून पळ काढला.

भटक्या कुत्रीवर नराधमाचा अत्याचार : दरम्यान ६ ऑक्टोबर रोजी नमन याच्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात आरोपी रामजसवर भादंवि कलम ३७७, सह प्राण्यांचा छळ अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सायली शिंदे करीत आहेत. यापूर्वीही एका भटक्या कुत्रीवर ४५ वर्षीय विकृत नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात विकृतावर गुन्हा दाखल करून नराधमाला बेड्या ठोकल्या होत्या. रिजवान अब्दुल शेख (वय ४५) असं अटक केलेल्या विकृताचं नाव आहे.

भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार : उल्हासनगर-अंबरनाथ मार्गावरील साईबाबा मंदिराशेजारी एक वस्ती आहे. या वस्तीत नराधम रिजवान राहतो. तर त्याच्या शेजारीच २१ वर्षीय तरुणी राहत असून या दोघांमध्ये काही कारणावरून सायंकाळच्या सुमारास वाद झाला होता. त्या वादातून नराधमाने तरुणीला शिविगाळ करत तिच्या समोरच एका भटक्या कुत्रीला घेऊन नराधम रिजवान त्याच्या घरात गेला. त्यानंतर घरातच भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केला. ही माहिती त्या तरुणीला मिळताच तिने २ मार्च रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३७७, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल होता.

म्हशीच्या रेडकावर अनैसर्गिक अत्याचार: प्राण्यावरील अनैसर्गिक अत्याचाराची अशीच एक घटना पुण्यात अलीकडेच घडली आहे. माणुसकीला लाजवणारी ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातून 5 ऑक्टोबर, 2023 रोजी समोर आली आहे. शहरात एका 24 वर्षीय व्यक्तीने म्हशीच्या रेडकावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या व्यक्तीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीनं म्हशीच्या दीड वर्षांच्या रेडकाचे पाय बांधून छळ करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकरणी गणेश पंडित जाधव (रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हेही वाचा:

  1. Sexual Assault With Animal : लैंगिक भूक भागवण्यासाठी रेडकावर करायचा अनैसर्गिक अत्याचार; वाचा कसं फुटलं बिंग
  2. Little Girl Rape Case : चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, नराधमाला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी वापरली 'ही' युक्ती
  3. Thane Rape Case : धक्कादायक! क्लिनिक बंद करून २५ वर्षीय गतिमंद तरुणीवर डॉक्टरचा अत्याचार

Last Updated : Oct 7, 2023, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.