ठाणे : अंबरनाथ - बदलापूर रोड भागातील हायप्रोफाइल परिसर असलेल्या रिलायन्स मार्केट भागात दोघे दलाल हे काही तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, जमादार श्रद्धा कदम, डी. व्ही. चव्हाण, डी. के. वालगुडे, हवालदार पी. ए. दिवाळे, अंमलदार आर. व्ही. कदम, व्ही. बी. यादव आणि के. डी. लादे आदींच्या पथकाने १० जानेवारी रोजी सायंकाळच्य सुमारास अंबरनाथ - बदलापूर रोड भागात सापळा रचला होता. त्यानंतर पोलीस पथकाने एका बनावट ग्राहकाच्या माध्यमातून आरोपी दलाल सोनू काझी यांच्याशी संर्पक केला. त्यावेळी त्या बनावट ग्राहक व दलालामध्ये पाच हजारांमध्ये एका तरुणीचा सौदा केला.
२५ वर्षीय तरुणी सौदा ठरल्याप्रमाणे घटनास्थळी आल्यानंतर तिला तीन हजार रुपये देण्यात आले. तर एक हजार रुपये आरोपी दलाल सोनूने स्वत:कडे ठेवून उर्वरित एक हजार रुपये गगन शर्मा नामक रिक्षा चालकाला दिले. हा सौदा सुरु असतानाच, त्या बनावट ग्राहकाने सापळा रचून बसलेल्या पोलीस पथकाला इशारा केला. पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी धाड टाकून आरोपी दलाल सोनू आणि रिक्षा चालक गगन शर्मा या दोघांना ताब्यात घेतले. या दोघा विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन्ही आरोपीना अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात देऊन अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पुढील पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे करीत आहेत.
नुकतेच सेक्स रॅकेटमधून 26 महिलांची सुटका दक्षिण मुंबईतील एका घरात पोलिसांनी छापा टाकत सेक्स रॅकेटमधून 26 महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत त्यांनी चार जणांना अटक केली होती. त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. परिसराची कसून झडती घेतल्यानंतर पोलिसांना घरातच गुप्त बांधलेली रूम आढळली. यात 26 महिलांना ठेवण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. त्यांची सुटका केल्यावर, विविध राज्यांतील महिलांनी पोलिसांना सांगितले की त्यांना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आले बुधवारी 22 डिसेंबरला पोलिसांनी कारवाईबाबतची माहीती दिली. एकाला ग्राहक म्हणून पाठवल्यानंतर विश्वसनीय माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने मंगळवारी लॅमिंग्टन रोड परिसरातील एका इमारतीमधील घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान, तीन महिलांसह चार जणांना पकडण्यात आले. हे सर्व रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. कारवाई दरम्यान त्यांचे दहा साथीदार घटनास्थळावरून पळून गेले, असे अधिकाऱ्याने सांगितले.