ETV Bharat / state

Thane Crime : अट्टल सात गुहेगारांकडून २३ गुन्ह्यांची कबुली, भिवंडी पोलिसांनी जप्त केला लाखो रुपयांचा मुद्देमाल - भिवंडी पोलीस

शांतीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी पत्रकार परिषेद घेतली होती. पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांकडून 23 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्याची माहिती या परिषदेत देण्यात आली.

भिवंडी पोलिसांची मोठी कामगिरी
भिवंडी पोलिसांची मोठी कामगिरी
author img

By

Published : May 22, 2023, 5:15 PM IST

पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे

ठाणे : भिवंडी पोलिसांनी दमदार कामगीरी करत 7 अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकून त्यांनी केलेल्या २३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या अटक गुन्हेगारांकडून लाखोंचा मुद्देमालाही हस्तगत करण्यात आला आहे. याच गुन्हेगारांकडून आणखी काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता भिवंडीचे पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी व्यक्त केली आहे. पोलीस पथक तपास करत असल्याचे आज शांतीनगर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषेदत माहिती देताना प्रसारमाध्यामांना सांगितले.

बाईक चोरी करणारे त्रिकूट : भिवंडी शहरात वाहन चोरीच्या गुन्हासह मोबाईल, आणि घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस उपआयुक्त ढवळे यांनी हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्याला आळा घालण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार शांतीनगर पोलिसांच्या पथकाने वाहने चोरी करणाऱ्या त्रिकुटाचा शिताफीने शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. बिलाल रिजवान अन्सारी (वय २७, रा. मालेगाव ) मोहमद सैफ शफिक खान (वय २४, शांतीनगर भिवंडी),राहील फकीरउल्ला अन्सारी ( वय २६, रा. गौबीनगर भिवंडी) असे वाहने चोरी करणाऱया गुन्हेगारांची नावे आहेत. विशेष म्हणजे भिवंडीतील दोन आरोपी हे शहरातील दुचाक्यांसह रिक्षा चोऱ्या करून मालेगाव भागात विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. गुन्हेगारांच्या या त्रिकूटाकडून १९ वाहन चोरीचे गुन्हे आतापर्यत उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

या पोलिसांनी केली कारवाई : या तीन गुन्हेगारांपैकी बिलाल याला तांत्रिक आणि बातमीदारच्या आधारे मालेगावातून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे, संतोष तपासे, पोलीस हवालदार रविंद्र चौधरी, महेश चौधरी, रिजवान सैयद,पोलीस नाईक किरण जाधव,श्रीकांत पाटील, किरण मोहीते,पोलीस शिपाई रविंद्र पाटील ,नरसिंह क्षीरसागर,दिपक सानप,मनोज मुके,तौफीक शिकलगार, विजय ताटे या पोलीस पथकाने सापळा रचून अटक केली. त्यानंतर त्याने वाहने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचे भिवंडीत राहणाऱ्या दोन साथीदारांचा शोध घेऊन त्यांनाही अटक केली.

14 बाईक, चार रिक्षा करण्यात आले जप्त : या अटक गुन्हेगारांकडून 14 दुचाक्या , 4 रिक्षा असे 18 वाहने आतापर्यत जप्त करण्यात आली आहे. या गुन्हेगारांनी शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 वहाने चोरी केल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही शांतीनगर पोलीस पथकाने 19 वाहने चोरी झाल्याचे गुन्हे उघकीस आणले होते. पोलिसांनी एकूण 38 वाहन चोरीचे गुन्हे महिन्याभरात उघडकीस आणले आहे. या अटल गुन्हेगारांकडून 7 लाख 90 हजार रुपये किंमतीचे वाहने आतापर्यत जप्त करण्यात आली आहे.

दीड लाख रुपयाच्या मोबाईलची चोरी : भिवंडी शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शांतीनगर पोलिसांनी सतर्कतेने तपास करत मोबाईल चोरी करणाऱ्या दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक केली. या दुकलीकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 8 महागडे मोबाईल जप्त करण्यात आला आहेत. योगेश चंद्रलाल माखिजा (वय ३५ रा. उल्हासनगर,) करण रशमीन गडा (वय २१ रा.डोंबिवली) अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांच्या मुसक्या अवळत त्यांच्या जवळून गुन्हे करताना वापरात असलेली एफ झेड दुचाकी व विविध मोबाईल कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी शांतीनगर व मानपाडा पोलिस ठाणे येथील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

तीन लाखांची घरफोडी करणारे दोन गुन्हेगारांना अटक : भिवंडी शहरातील श्रीरंग नगर येथील एका बंद घरात घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्हेगारांकडून पोलिसांनी ३५ हजार रोख रक्कम आणि २ लाख ५८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. श्रीरंग नगर येथील कृष्णगोपल विश्वनाथ प्रसाद केसरी यांच्या घरात १४ मे रोजी झालेल्या घरफोडीत सुमारे २ लाख ९३ हजार १५० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेची चोरी झाली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे, यांनी या चोरीचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळ्या पोलीस पथकासह गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवत गुन्हेगार नवाज हिदायदउल्ला खान (रा. गैबी नगर) , अशफाक मजहरअली अन्सारी ( रा जैतूनपुरा ) अशा दोघांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी शिताफीने आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलला सर्वच मुद्देमाल हस्तगत करून आरोपीस अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील हे करीत आहेत.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime : सोन्याच्या तस्करी प्रकरणी 6 परदेशी नागरिकांना अटक, मुंबई विमानतळावर कस्टम्स विभागाची कारवाई
  2. Bilaspur Crime News : महिलेवर चिमुरडीच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप, हिंदू संघटनांनी विरोध करत पोलिस ठाण्याला घातला घेराव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.