ठाणे बदलत्या काळानुसार समाजापुढे नवं नवे प्रश्न उभे राहत असतात. आज समाजातील अनाधार वृद्धांसमोर सध्या वृद्धाश्रमाचा प्रश्न मोठा असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही वृद्धांना वृद्धाश्रम एक जीवनदान ठरतंय. आजच्या विज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनामुळे मानवाने विविध आजारांवर मात केली आहे. मात्र मानवाची आयुमर्यादा वाढत असल्याने देशातील लोकसंख्येतील वृद्धांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच बदलत्या काळात कौटुंबिक पद्धत बदलत चालली असल्याने वृद्धांसमोर वृद्धाश्रमाचा प्रश्न मोठा असल्याचे दिसून येत आहे.
हजारो वृद्ध फक्त जुन्या आठवणींमध्ये आपल जीवन जगतात पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होते. त्याकाळी आपले वृद्ध आई, वडील, आजी, आजोबा यांची प्रामुख्याने सर्व कुटुंब काळजी घेत होत. मात्र आजच्या बदलत्या युगात घरातील मुलगी असो व सून प्रत्येक स्त्री नोकरीसाठी बाहेर पडते. त्यामुळे घरात मोजकेच लोक असतात. सध्या देश सर्व क्षेत्रात इतकं गतिने पुढे जात आहे कि, गतिमान युगात नोकरी धंद्यासाठी बाहेर असणाऱ्या मुला- मुलींना आपल्या घरातील वृद्धांची काळजी घ्यायला, त्यांच्यासाठी वेळ काढायला सुद्धा वेळ मिळत नाही. मग या वृद्धांसमोर एकाच पर्याय ठेवला जातो. तो म्हणजे वृद्धाश्रम. देशात मोठ्या प्रमाणात खाजगी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृद्धाश्रम उभारली गेली आहेत. या वृद्धाश्रमांमध्ये एकेकाळी आपल्या कुटुंबात, आपला मुलगा, मुलगी, नातवंडांसोबत आनंदाने राहणारे हजारो वृद्ध फक्त जुन्या आठवणींमध्ये आपल जीवन जगत आहेत. कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या मुला- मुलींना आपल्या वृद्ध आई वडील किंवा कुटुंबातील वयोवृद्धांची काळजी घेता येत नाही. त्यांचा सांभाळ करता येत नाही. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी दर महिना हजारो रुपये खर्च करून त्यांना खासगी वृद्ध आश्रमात पाठवलं जात.
खासगी वृद्धाश्रमशिवाय पर्याय नाही त्याठिकाणी असलेले कर्मचारी, डॉक्टर अगदी घरच्यांसारखा सांभाळ करतात. आणि येथील वृद्धांना देखील आपण आपल्या घरात, आपल्या कुटुंबात असल्याची जाणीव होते. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा भागात असलेल्या ओल्ड एज होममध्ये राहणाऱ्या जेष्ठ लेखिका माया राही आणि एकेकाळी मुख्याध्यापिका असलेल्या सविता नेटपाठे त्यांचे इथे राहत असल्याचे अनुभव सांगत असताना, त्यांना इथे मिळत असलेलं कुटुंबसुख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत. तर गरीब गरजू वृद्धांना खासगी वृद्धाश्रमात काही नियम, मर्यादा असल्याने ठेऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्याकडे लक्ष देणं त्यांचा सांभाळ करणं गरजेचं असल्याचं खासगी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सांगतात.
निराधार वृद्धांचे काय सरकारने द्यावे लक्ष श्रीमंत कुटुंबातील वृद्धांचा सांभाळ करण्यासाठी मोठं मोठे ओल्ड एज होम आहेत. मात्र प्रश्न आहे, तो निराधार वृद्धांचा. आई, वडील, आजी, आजोबा वृद्ध झाल्याने त्यांना घरात ठेवणं, त्यांचा सांभाळ करणं आत्ताच्या पिढीला जमत नाही. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढून देण्याचे अनेक प्रकार वाढत जात आहेत. देशात सरकारी किंवा सामाजिक संघटनांनी अनेक वृद्धाश्रम उभारले आहेत. मात्र त्याठिकाणी त्यांच्या नीट सांभाळ होतो का ? त्यांना त्याठिकाणी कुटुंबासारखं प्रेम मिळतंय का ? हे देखील पाहन गरजेचं आहे. तसेच देशात वाढत असलेली वृद्धांची संख्या पाहता प्रत्येक राज्य सरकारने वृद्धाश्रमाची संख्या वाढवावी जेणेकरून कोणतंही वृद्ध दांपत्य निराधार राहणार नाही.
बेडवर पडून असलेल्या वृद्धांचे सर्वत्र हालच महाराष्ट्रात आणि देशात एकूणच कुठल्याही वृद्धाश्रमामध्ये बेडवर असणाऱ्या वृद्धांना दाखल करून घेतलं जात नाही. त्यामुळे मग त्यांची आर्थिक परिस्थिती खराब असली, तर बेघर राहून मृत्यूची वाट पहावी लागते आणि म्हणूनच अशा वृद्धांसाठी सरकारने काहीतरी दखल देऊन त्यांची व्यवस्था लावावी. सरकारी वृद्धाश्रम सुरू करावी आणि या वृद्धांची लहान मुलांसारखीच काळजी घ्यावी, अशी विनंती आता वृद्ध करत आहेत.