ठाणे : सोने पळवून नेणारी टोळी सीसीटीव्हीत कैद झाली असून येथील महेश नावाच्या सुरक्षा रक्षकाने दरोड्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ह्या घटनेनंतर सुरक्षा रक्षक साथीदारासह फरार झाला असून पोलिसांनी ४ पथके तयार करून तपासाची चक्र फिरवली आहेत.
6 किलो सोने लंपास : पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या कॅम्प नंबर एक भागातील शिरू चौकात पुरुषोत्तम बदलानी यांच्या मालकीचे विजयलक्ष्मी ज्वेलर्स आहे. हे ज्वेलर्स दुकान मंगळवारी २६ जून ते २७ जूनच्या सकाळपर्यत बंद होते. याच सुमारास दुकान बंद असल्याची संधी साधून याठिकाणी सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने चार ते पाच साथीदारांच्या मदतीने गॅस कटरच्या साह्यायाने तिजोरीचे लॉक तोडून तब्बल ६ किलो सोने लंपास केले.
डीव्हीआर नेला पळवून : विशेष म्हणजे, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील या टोळीने तोडफोड करून डिव्हीआर पळवून नेला आहे. पळवून नेलेल्या ६ किलो सोन्याची किंमत ६ कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विविध तपासकामी चार पथक नेमले आहेत. पोलिसांनी एका संशयित इसमाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
चौकशी न करताच ठेवले कामावर: फरार असलेला सुरक्षा रक्षक हा गेल्या १५ दिवसांपूर्वीच ज्वेलर्समध्ये कामाला आला होता. खळबळजनक बाब म्हणजे, सुरक्षा रक्षकाची कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा आयडी फ्रुप संबंधित ज्वेलर्स मालकाने न विचारता त्याला कामावर ठेवल्याचे समोर आले. त्यामुळे हा मास्टर माईंड सुरक्षा रक्षक लवकर सापडणे पोलिसांसमोर एक आवाहन उभे राहिले आहे.
हेही वाचा: