ठाणे - अल्पवयीन शाळकरी मुलीला चायनीज आणि वडापावचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त गाव म्हणून घोषित केलेल्या कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार समोर आला आहे.
![school-girl-physical-abuse-by-two-men-in-thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5584854_thane.jpg)
एक नराधम वडापाव विक्रेता तर दुसरा चायनीजचा धंदा करणारा असून या दोघासह अन्य दोघा नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. तर तंटामुक्त गाव म्हणून घोषित केलेल्या गावाला या कृत्यामुळे गालबोट लागले आहे. या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्यांच्या वडापाव व चायनीज गाडीची तोडफोड करून आपला संताप व्यक्त केला आहे. माधव मगर (वय 37) व विश्वनाथ तरणे (वय 40) याच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत अल्पवयीन पीडित मुलगी ५ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. या शाळेसमोरच मोकळ्या पटांगणात त्या गावातील वडापाव विक्रेता आरोपी माधव आणि विश्वनाथ तरणे हा चायनीजच्या गाडीवर व्यवसाय करत होते. या पीडित मुलीला वडापाव आणि चायनीज खाण्याचे आमिष दाखवून दोन महिन्यांपासून या दोघांसह अन्य दोघे लैंगिक अत्याचार करत होते. मात्र, अत्याचाराचा त्रास असह्य झाल्याने पीडित मुलीने आपल्या आईला सतत घडत असणारी घटना सांगितली. मुलीच्या आईने पीडितेला घेऊन या दोघा नराधामा विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे.
तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांना विचारले असता दोन्ही आरोपी वर कलम 376 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले. तंटामुक्त गाव असल्याने येथील पोलीस ठाण्यात कुठलाच गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या घटनेने तंटामुक्त गावात मात्र तणावपूर्वक वातावरण निर्माण केले आहे.