ETV Bharat / state

School Boy Kidnapping : दीड कोटींच्या खंडणीसाठी शाळेकरी मुलाचे अपहरण; 300 पोलिसांची टीम लागली होती कामाला

author img

By

Published : Nov 13, 2022, 7:38 PM IST

डोंबिवली एमआयडीसीतून दीड कोटींच्या खंडणीसाठी अपहरण (school boy Kidnapping in Thane for ransom) करण्यात आलेल्या एका १२ वर्षाच्या शाळकरी मुलाचे सुरत (गुजरात) येथून फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका (Police released kidnapped boy) करण्यात मानपाडा पोलिसांना शनिवारी यश आले. Latest news from Thane, Thane Crime

School Boy Kidnapping
दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शाळेकरी मुलाचे अपहरण

ठाणे : डोंबिवली एमआयडीसीतून दीड कोटींच्या खंडणीसाठी अपहरण (school boy Kidnapping in Thane for ransom) करण्यात आलेल्या एका १२ वर्षाच्या शाळकरी मुलाचे सुरत (गुजरात) येथून फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका (Police released kidnapped boy) करण्यात मानपाडा पोलिसांना शनिवारी यश आले. खळबळजनक बाब म्हणजे अपहरणाचा मास्टरमाईंड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दुहेरी हत्याकांडसह अनेक गंभीर दाखल आहे. Latest news from Thane, Thane Crime

गुन्ह्यात नातेवाईकांचा समावेश- गुन्ह्यात त्याच्या बायको, बहिणीसह प्रेयसी आणि मेहुण्याच्या सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्यांनाही बेड्या ठोकल्या आहे. फरदशहा फिरोजशहा रफाई, मुख्य आरोपी (२६, पालघर, मूळ निवासी गुजरात, राजकोट), प्रिंसकुमार रामनगिना सिंग (२४, भावनगर, गुजरात, मेहुणा ), शाहीन शाबम मेहतर (२७, राजकोट, मुख्य आरोपीची प्रेयसी ), फरहीन प्रिंसकुमार सिंग (२०, फरदशहाची. बहीण), नाझिया फरदशहा रफाई (२५, पत्नी). असे अटक आरोपींची नावे आहेत.

वरना बच्चे को जान से मार देंगे- तक्रारदार रंजीत सोमेंद्र झा (४५) यांची डोंबिवली एमआयडीसीत कंपनी असून पत्नी, तीन मुलांसह एमआयडीसी निवासी भागात राहतात. त्यांचा रुद्रा (१२) मुलगा इयत्ता सातवीत माॅडेल इंग्लिश शाळेत शिक्षण घेतो. तो नियमित मिलापनगर मधील एका खासगी शिकवणीसाठी सकाळी आठ वाजता पायी जातो. सकाळी १० वाजता पायी एकटाच घरी येतो. बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे तो एकटाच पायी शिकवणीसाठी गेला. तो नेहमीप्रमाणे घरी आला नाही. त्यामुळे वडील रंजीत झा, पत्नी कामिनी, दोन मुले खासगी शिकवणी वर्ग होत असलेल्या सोसायटीत गेले. शिकवणी वर्ग बंद झाले होते. त्यांनी एमआयडीसी परिसरात रुद्राचा शोध घेतला. तो आढळून आला नाही. रुद्राचा शोध सुरू असताना वडील रंजीत यांना एक अनोळखी इसमाचा फोन आला असता “ आपका लडका हमारे पास है. बच्चा चाहते हो, तो एक करोड रूपये का इंतजाम करो वरना बच्चे को जान से मार देंगे.” मात्र त्यावेळी त्यांनी प्रतिसाद दिला. परंतु मोबाईलवर ज्यावेळी मुलगा रुद्रा वडिलांना ‘माझे काही लोकांनी अपहरण केले आहे’ असे सांगितले. तेवढे बोलणे झाल्यानंतर अपहरणकर्त्यांनी स्वताकडे मोबाईल घेऊन ‘आम्ही तुमच्या मुलाचे अपहरण केले आहे. दोन दिवसात एक कोटीची खंडणी द्या नाहीतर मुलाला ठार मारु’ अशी धमकी दिली.

पोलिसांची २० तपास पथके तयार - या धमकीला घाबरून रंजीत यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना सांगितला. त्यानंतर वडिलांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात भा.दं.वि. ३६३, ३६४ (अ), ३८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांच्या आदेशावरुन ठाणे जिल्ह्यातील गुन्हे शाखेचे सर्व वरिष्ठ, कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली, कल्याण मधील पोलिसांची २० तपास पथके तयार करण्यात आली. शिवाय वरिष्ठ निरीक्षकांची सहा स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल लोकेशनवरून आरोपींचा पाठलाग - पोलीस पथकाने बुधवारी मुलगा घर ते शिकवणी वर्गात गेला त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. वडील रंजीत यांना यांना आरोपींकडून आलेल्या मोबाईलचा तांत्रिक माग पोलिसांनी काढला. आरोपींनी निस्सान कंपनीची दॅटसन गो हे वाहन अपहरणासाठी वापरले असल्याचे एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. अपहरणकर्तेचे वाहन डोंबिवलीतून बदलापूर, खडवली, जव्हार मार्गे नाशिककडे गेल्याचे आढळले. नाशिक, जव्हार, मोखाडा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. विशेष म्हणजे मार्गावरील वाहन सीसीटीव्हीत दिसून नये म्हणून आरोपी आडमार्ग, जंगल मार्गाचा वापर करत होते. शिवाय ते वाहन क्रमांक सतत बदलत होते. नाशिक, जव्हार परिसरात पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ पथकासह नाकाबंदी करुन वाहने तपासत होते. त्यातच गुरुवारी १० नोव्हेंबर रोजी पुन्हा आरोपींनी रंजीत यांना संपर्क करुन ‘तुम्हाला खंडणी द्यायची नाही का. आता दीड कोटी येत्या तीन तासात द्या अन्यथा मोठी किमत तुम्हाला चुकवावी लागेल’ असा इशारा दिला. झा कुटुंबीय चिंताग्रस्त होते.

पोलीस पथकाला धडक देऊन मारण्याचा प्रयत्न - कल्याणचे वरिष्ठ निरीक्षक अशोक होनमाने हे पोलीस पथकासह जव्हार, मोखाडा भागात गस्तीवर असताना त्यांना आरोपींचे वाहन काही अंतरावरुन सुसाट गेल्याचे दिसले. त्यांनी समोरीला पथकाला वाहन अडविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याचे सपोनि सुनिल तारमळे व अविनाश वनवे यांनी अपहरकर्त्याचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्यांच्यावर वाहन घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत वाहन पालघर , जव्हार जंगलात नेले. तरीही पोलीस पथक त्यांचा पाठलाग करत होते. पोलीस आपल्या मागावर येत असल्याचे पाहून आरोपींनी जंगलात वाहन सोडून रुद्रासह जंगलातील दऱ्याखोऱ्यातून पसार झाल्याने पोलीस पथकांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगल परिसर पिंजून काढला. शिवाय आरोपींना पकडणाऱ्यांना ५० हजाराचे बक्षिस लावण्यात आले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपी जंगलातून पसार झाले.

वाहनामुळे मास्टरमाईंडचे नाव आले समोर - तर सोडून गेलेल्या आरोपींच्या वाहनामध्ये सुरा, रुद्राची वही, चप्पल आढळली. शिवाय या वाहनावरुन या कटाचा मुख्य सूत्रधार फरदशहा फिरोजशहा रफाई असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्यावर असलेल्या गुन्ह्याची माहिती घेऊन तो राहत आलेल्या पालघर व गुजरात मधील मूळ घराचा ठावठिकाणा मिळवला. तोपर्यत आरोपी पालघरच्या जंगलातून गुजरात दिशेने पळाले असल्याचे तांत्रिक विश्लेषणात दिसले. पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद मार्ग, तलासरी आच्छाड नाका येथे तपास सुरू केला. आरोपी फरदशहा पालघर येथे राहत असला तरी मुळचा तो सुरत राजकोट येथील रहिवासी असल्याचे समोर आल्याने गुजरात, सुरत पोलिसांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झाली.

सामानाचा टेम्पोमुळे माग - मास्टरमाईंड फरदशहा याने पालघर मधील घरातील सामान रात्रीतून एका टेम्पोने सुरतमधील आपल्या घरी पाठविले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महाराष्ट्र वाहन क्रमांक असलेले गुजरात, सुरत मध्ये आलेले टेम्पो तपासले. त्यात एक टेम्पो चालक ताब्यात घेतला. त्याने फरदशहाचा सुरत मधील घराचा पत्ता दिला. साध्या वेशातील पोलिसांनी जाऊन घराची टेहळणी केली. एकावेळी ५० हून अधिक पोलिसांच्या पथकाने फरदशहाच्या घरात छापा टाकला. दोन पुरुष, तीन महिला आरोपी अपहृत रुद्रासह लपून बसले होते. पोलिसांनी पहिले रुद्राला सुखरुप ताब्यात घेऊन आरोपींना जागीच अटक केली. या कामगिरीबद्दल तपास पथकाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

३०० पोलीसांची मुलाच्या सुटकेसाठी मेहनत - खंडणी दिली नाही तर अपहरणकर्ते मुलाच्या वडिलांना मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी मोबाईलवरुन सतत देत होते. हा विषय अतिशय संवेदनशील बनला होता. कोणत्याही परिस्थितीत मुलाला आरोपींच्या तावडीतून सुखरुप सोडविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मुलाचे वडील उद्योजक असल्याने त्यांच्याकडून आपली खंडणीची मागणी पूर्ण होईल असा विश्वास अपहरणकर्त्यांना होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक कौशल्य शिताफिने वापरुन मुख्य आरोपीच्या सुरत मधील घरात छापा मारुन अपहृत मुलासह पाच आरोपींना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे बुधवारी सकाळपासून ते शनिवारी दुपारपर्यंत सलग चार दिवस डोंबिवली, कल्याण, नाशिक, जव्हार, गुजरात, सुरत मधील सुमारे ३०० पोलीस एकावेळी या मुलाच्या सुटकेसाठी अहोरात्र मेहनत घेत होते.

पोलीस पथकही भावून झाले - विशेष म्हणजे गुजरात मधील भावनगर मधून मुलाची पोलीस पथकाने सुखरूप सुटका केली त्यावेळी मुलाला खांद्यावर उचलून पोलिसांनी आनंद व्यक्त केला. तर ज्यावेळी पोलीस पथक मुलाला घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी आई-वडिलांना बोलविण्यात आले. मुलाला सुरुखप पाहताच आईने त्याला कुशीत घेऊन आनंदाचे अश्रू आईच्या डोळ्यात तरळल्याचे पाहून पोलीस पथकही भावून झाले होते. चार दिवसात अपहरणकर्त्यानी त्याला केवळ दोन तीन वेळा डाळ-भात खायला दिल्याचे मुलाने सांगितले. शिवाय वारंवार जीवे ठार मारण्याची धमकीही अपहरकर्ते देत होते. अशीही माहितीही त्याने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.