ETV Bharat / state

भिवंडीत रस्त्यांवरील खड्ड्यात दहीहंडी फोडून संघर्ष समितीने केला प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा निषेध

भिवंडी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची पावसामुळे वाईट अवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबत कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे भिवंडी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यातील खड्ड्यावर दहीहंडी फोडून महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला.

author img

By

Published : Aug 23, 2019, 9:30 PM IST

भिवंडीत रस्त्यातील खड्ड्यात दहीहंडी फोडताना संघर्ष समितीचे कार्यकर्ते

ठाणे - भिवंडी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची पावसामुळे वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच-खड्डे नजरेस पडतात. तसेच, गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सव जवळ येऊन ठेपले आहेत. असे असतानाही पालिका प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबत कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे भिवंडी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यातील खड्ड्यावर दहीहंडी फोडून महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला.

भिवंडीत रस्त्यातील खड्ड्यात दहीहंडी फोडून संघर्ष समितीने केला प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा निषेध
भिवंडी संघर्ष समितीचे प्रमुख सुहास बोंडे यांच्या नेतृत्वाखाली वंजारपट्टी नाका ते कल्याण नाक्यादरम्यान असलेल्या खड्ड्यात हा आगळावेगळा निषेध नोंदवण्यात आला. शहरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्ते मागील 2 वर्षापासून नादुरुस्त आहेत. यावर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. याचा त्रास भिवंडीकर नागरिकांना व वाहनचालकांना सोसावा लागत आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त शहरात गोविंदा पथकाचे जथ्थे रस्त्यावर उतरणार आहेत. जर दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सुहास बोंडे यांनी उपस्थित केला. झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी खड्ड्यात दहीहंडी फोडण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. या आंदोलनात सुहास बोंडे यांच्यासह संजय चव्हाण, प्रवीण जैन, बाबूलाल बोदुल, सुहास बचुटे, अभिषेक पुसद, राजू बजाज, अल्ताफ अन्सारी, दीप्ती देशमुख आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाची कल्पना वाहतूक पोलीस प्रशासनाला नसल्याने आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Intro:किट नंबर 319

Body:भिवंडीत खड्डेमय रस्त्यांवर दहीहंडी फोडून संघर्ष समितीने केला प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा निषेध

ठाणे : भिवंडी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची पावसामुळे चालवून खड्डेमय रस्ते सर्वत्र दृष्टीसपेक्षास पडत असताना गोकुळाष्टमी गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे असे असतानाही पालिका प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्डे भरणे बाबत कोणतीही गांभीर्य बाळगल जात नसल्याने भिवंडी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी खड्डेमय रस्ता दहीहंडी फोडून महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा ही निषेध नोंदवला आहे,

भिवंडीकर संघर्ष समितीचे प्रमुख सुहास बोंडे यांच्या नेतृत्वाखाली वंजारपट्टी नाका ते कल्याण नाका दरम्यान न्यायालय समोरील मोठ्या खड्ड्यात हा आगळावेगळा निषेध नोंदवण्यात आला आहे,
शहरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्ते मागील 2 वर्षापासून नादुरुस्त असताना यंदा जुलै ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी पडलेल्या मुसळधार पावसाने या रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन सर्व रस्ते खड्डेमय झाले आहे, त्याचा नाहक त्रास भिवंडीकर नागरिकांना व वाहनचालकांना सोसावा लागत असून दहीहंडी, गणेशोत्सव सण तोंडावर आले असतानाही महापालिका प्रशासन या खड्ड्यांना भरण्यासाठी गांभीर्य बाळगत नसून दहीहंडी उत्सवानिमित्त शहरात गोविंदा पथकाचे जथ्थे उद्या रस्त्यावर उतरणार आहे, त्यांचा जर दुर्दैवाने अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न करीत सुहास मुंडे यांनी झोपलेल्या प्रशासनात जागे करण्यासाठी खड्ड्यात दहीहंडी फोडण्यात आल्याचे सांगितले.
या रस्त्यात दिवस रात्र त्रास सहन करूनही आंदोलन न करता भिवंडी कर नागरिक सोशिकपणा दाखवित असल्याने त्यांना गुलाब पुष्प देण्यात आले असल्याचेही सुहास बंड यांनी सांगितले. या आंदोलनात सुहास बोंडे यांच्यासह संजय चव्हाण, प्रवीण जैन , बाबूलाल बोदुल, सुहास बचुटे पुसद अभिषेक राजू बजाज अल्ताफ अन्सारी दीप्ती देशमुख यांच्यासह अधिकार कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनाची कल्पना वाहतूक पोलीस प्रशासनाला नसल्याने आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती,
ftp fid ( 1, bayet, 1 vis )
mh_tha_2_bhiwandi_khadde_rod_in_dhihndi_1_bayet_2_vis_mh_10007

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.