ETV Bharat / state

सचिन वझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

author img

By

Published : Mar 13, 2021, 8:38 PM IST

Updated : Mar 13, 2021, 9:50 PM IST

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला असून 19 मार्चला याबाबत सुनावणी होणार आहे.

Sachin Vaze
सचिन वझे

ठाणे - मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएस यंत्रणेने हत्येचा गुन्हा दाखल केल्याने अटक होण्याच्या उंबरठ्यावरील सचिन वझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जाचे परीक्षण केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायधीश शैलेंद्र तांबे यांनी मात्र अटकपूर्व जामीन देता येणार नसल्याचे सांगितले आहे. मुख्य संशयित असलेल्या वझे यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्यामुळे सचिन वझे यांचा जामीन देता येणार नाही, असा निष्कर्षही नोंदविण्यात आला आहे. त्यावर पुन्हा 19 मार्चला सुनावणी होणार असून यामध्ये न्यायालय हे एटीएस तपास यंत्रणेचेही म्हणणे ऐकून घेणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सचिन वझे यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता वझे यांना अटक झाल्यानंतर जामीन मिळवावा लागणार आहे.

बोलताना विधीज्ञ

मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एटीएसने (दहशतवादी विरोधी पथक) विमल मनसुख हिरेन यांच्या तक्रारीवरून भा.दं.वि. कलम 302, 201, 120 ब व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

यापूर्वी 58 दिवसांच्या कोठडीनंतर वझेंना मिळाला होता जामीन

सचिन वझे यांच्या वतीने ठाणे सत्र न्यायालयात न्यायधीश शैलेंद्र तांबे यांच्या दालनात सुनावणीत के. एम. कालेकर यांनी युक्तीवाद केला. त्यांनी सांगितले, अर्जदार सचिन वझे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. घटनेच्या वेळी अर्जदार हे डोंगरी परिसरात होते. त्यामुळे हत्या करण्याचा प्रश्नच नाही. दरम्यान, कालेकर यांनी न्यायालयाला 2004 च्या घटनेबाबतही सांगितले. या प्रकरणातही सचिन वझे यांना गोवण्यात आले होते. त्या वेळीही 58 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर त्यांना जमीन देण्यात आला होता. तसेच गुन्ह्यात एटीएस पथकाने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वझे यांच्यावर कुठलाही आरोप नाही. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी काहीच हरकत नाही.

काय म्हणाले सरकारी वकील

न्यायालयात सरकारी वकील विवेक कडू यांनी युक्तिवादात सांगितले, सचिन वझे व मनसुख हिरेन हे एकदुसऱ्यांशी परिचित होते. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली मोटारही सचिन वझे यांनी वापरलेली होती. आता या प्रकरणाचा तपस एटीएस करत आहे.

न्यायलयाचे निरीक्षण

अटक पूर्व जामिनावर ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी सचिन वझे आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकला आणि आपल्या निर्णयात म्हणाले, 27 आणि 28 फेब्रुवारीला अर्जदार वझे यांच्या सोबत मृत मनसुख हिरेन होते. त्यांच्या चौकशीनंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडतो. त्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या नावावर गुन्हा दाखल होता. मात्र, त्यात मृताचे पत्नी विमल यांना या प्रकरणाची माहिती आहे. वझे आणि मृत मनसुख हे सातत्याने संपर्कात होते. तसेच मृताच्या पत्नीने वझे यांच्यावर नावासह आरोप केल्याने आणि त्याची नोंदवलेल्या गुन्ह्यात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपस हा एटीएस पथक करत असून गुन्हा हा गंभीर आहे. त्यामुळे न्यायालय अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तपासात प्राथमिक पुरावे हे वझे यांच्या विरोधात असलयाने त्यांना अटकपूर्व जमीन नाकारण्यात येत असलयाचे न्यायाधीश तांबे यांनी अर्ज फेटाळताना स्पष्ट केले. एटीएस पथकाने अर्जदार आरोपींला ताब्यात घेऊन तपस करणे आवश्यक आहे. म्हणूनच अटकपूर्व जमीन फेटाळण्यात येत असल्याचा निकाल दिला. दरम्यान, याच प्रकरणात पुन्हा 19 मार्चला सुनावणी घेण्यात येणार असलायची माहिती विशेष सरकारी वकील कडू यांनी सांगितले.

वकील मित्राचा खुलासा

मनसुख हिरेन यांनी 2 मार्चला मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त आणि विक्रोळी पोलीस ठाणे या सर्वांना एक तक्रारा अर्ज केला होता. या अर्जात त्यांनी काही तपास यंत्रणेवर तसेच मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी, राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए), एटीएस व प्रसार माध्यमांवर मानसिक छळाचे आरोप केले होते. पण, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर मनसुख मिश्रीलाल हिरेन यांची पत्नी विमला मनसुख हिरेन यांनी दहशतवाद विरोधी पथकाला केलेल्या तक्रारीत तो तक्रारा अर्ज सचिन वझे यांनीच वकील कलपनाथ गिरी यांना सांगून बनवला होता आणि तो कोणा-कोणाला पाठवायचा आहे हे देखील सचिन वझे यांनीच सांगितले असल्याचे म्हणाल्या. हा अर्ज बनवणारे वकील कलपनाथ गिरी यांचा जबाब एटीएसने नोंदवल्यामुळे पुढील प्रश्न उपस्थित झाले आगेत. सचिन वझे यांनी मनसुख हिरेन यांना माझ्याकडे पाठवले होते. मनसुख माझा मित्र आहे त्याला मदत करा, असे सचिन वझे यांनीच मला सांगितले होते, असा धक्कादायक खुलासा देखील वकील कलपनाथ गिरी यांनी केला आहे.

हेही वाचा - 'ईटिव्ही भारत' विशेष - पाणीटंचाईला पाझर खड्ड्यांचा पर्याय

हेही वाचा - आंबिवलीच्या इराणी वस्तीत पोलिसांची धडक कारवाई; 5 गुन्हेगार अटकेत

Last Updated : Mar 13, 2021, 9:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.