ETV Bharat / state

२१ गुन्हे करणाऱ्या सराईत चोराला ठाणे पोलिसांकडून अटक

सराईत चोराला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अंधेर रेल्वे स्थानकावरुन अटक केले आहे. आरोपीने तब्बल 21 गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

robbery-case-mira-bhayandar-robber-is-arrested-by-thane-police
२१ गुन्हे करणाऱ्या सराईत चोराला ठाणे पोलिसांकडून अटक
author img

By

Published : Dec 25, 2019, 9:27 AM IST

मुंबई - घरफोडी करुन दागिणे चोरणाऱ्या सराईत चोराला अटक करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. आरोपी राजेंद्र पटेल (वय-37) याने मिरा भाईंदर परिसरात बऱ्याचदा घरफोडी करुन चोऱ्या केल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा चोर आढळून आला आहे.

२१ गुन्हे करणाऱ्या सराईत चोराला ठाणे पोलिसांकडून अटक

हेही वाचा - बँकेत तारण ठेवलेले सोने बनावट; जिजामाता बँकेनंतर बुलडाणा अर्बन पतसंस्थेला ८० लाखांचा गंडा

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर पाठीला बॅग अडकवून रेल्वे स्थानकाच्या बाजुस चालत जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चोराचा मागोवा घेतला तेव्हा तो भाईंदर किंवा मिरारोड रेल्वे स्थानकावरुन मुंबईकडे जाणारी लोकलने अंधेरी स्थानकावर उतरत असल्याचे दिसून आले. चोराच्या फोटोवरुन मुंबई परिसरात रेकॉर्ड तपासणीचे व आरोपीची ओळख पटवण्याचे काम पोलीस हवालदार किशोर वाडीले करत होते. पोलीस अधिक्षक व अपर पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यकंट आंधळे यांनी काशीमिरा गुन्हे शाखा या ठिकाणी येवून अधेरी रेल्वे स्थानकावर चोरावर लक्ष ठेवले.

अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करीत असताना हवालदार जाधव व सचिन सावंतने चोराला पकडले. त्याची तपासणी केली असता बॅगमध्ये घरफोडी करण्याची हत्यारे मिळून आली. तसेच मिरा भाईंदर परिसरात केलेल्या गुन्ह्यांची त्याने कबुली दिली. त्याचा साथीदार रोहीत बाळकृष्ण रेशीम, याच्या मदतीने केली असल्याची कबुली दिल्याने त्या दोघांना नवघर पोलीस ठाण्यात अटक केली. दोघांना 25 डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपींचे या वर्षांतील घरफोडीचे एकुण २१ गुन्हे उघडकीस झाले आहेत. त्यातील एकुण 36 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने 10 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागीणे असा एकुण 36 लाख 20 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

हेही वाचा - धक्कादायक : आईकडूनच मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Intro: मिरारोड-भाईंदर परिसरात दिवसा घरफोडून चोरी करणारा सराईत गुन्हेगारास केले गजाआड
चोराला पकडण्यासाठी पोलिसांनीच बसवले सिसिटिव्हि कॅमेरे तब्बल १ किलो सोने केले जप्तBody:

गेल्या काही महिन्यांपासून मिराभाईंदर परिसरामध्ये दिवसा दुपारच्या वेळी बंद घराचे कडी कोयडे तोडुन घरफोडी चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली होती... यामुळे मिराभाईंदर भागांत नागरीकांमध्ये एकच भितीचे वातावरण झाले होते... दिवस ढवळ्या चोरी होत असल्याने दिवसभर कामा निमित्त बाहेर गेलेल्या चाकरमानी तर दहशती खाली होते... एका मागोमाग एक चो-या होत असल्याने ठाणे ग्रामीण पोलीसांच्या कार्य पद्धतीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाते होते... शेवटी विशेष पोलिस पथक स्थापन करुन चोरीच्या घटनांनाचा मागोवा घेतला गेला आणि चोराला बेड्या ठोकल्या... धक्कादायक म्हणजे ज्या आरोपीला राजेंद्र पटेलला अटक केली त्या एकट्यानेच अगदी सराईतपणे गेल्या काही महिन्यात मिरी भाईंदर परिसरांत चो-या केल्या होत्या... कारण चोरीचे सिसिटिव्हि फुटेज तपासले असतां सगळ्याच चो-यांमध्ये ३७ वर्षीय राजेंद्र पटेल दिसत होता...
त्याप्रमाणे घरफोडी चोरी झालेल्या बिल्डींगचे आवारातील तसेच रस्त्यांचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणी दरम्यान, राजेंद्र पटेल चोरी करुन सॅक बॅग पाठीला लावुन रेल्वे स्टेशन बाजुस चालत जात असल्याचे दिसले. चोराचा सीसीटीव्ही तपासुन मागोवा घेता तो भाईंदर किंवा मिरारोड रेल्वे स्टेशन वरुन मुंबई कडे जाणारी लोकल पकडुन अंधेरी स्टेशनवर उतरत जात असल्याचे दिसुन आले. परंतु त्यापुढे कोठे जातो हे कळुन येत नव्हते. त्या इसमाचे मिळालेले फोटो वरुन मुंबई परीसरात रेकॉर्ड तपासणीचे व आरोपीची ओळख पटवण्याचे काम पोलीस हवालदार किशोर वाडीले, हे करीत होते. पोलीस अधिक्षक व अपर पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण यांचे मार्गदर्शना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो व्यकंट आंधळे यांनी काशीमिरा गुन्हे शाखा या ठिकाणी येवुन त्यांनी अधेरी रेल्वे स्टेशन वर उतरुन पुर्वेला चोरी करणारा इसम कोठे जातो याचा मागोवा घेण्यासाठी त्याठिकाणी खाजगी सीसीटीव्ही बसविण्या बाबत मार्गदर्शन केले, त्यांचे सुचनाप्रमाणे अंधेरी पुर्व कडील स्टेशनला लागुन असलेल्या इमारत मालकाची परवानगी घेवुन त्या ठिकाणी ठाणे ग्रामीण पोलीसा मार्फतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले व स्थानिक गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी सदर ठिकाणी वॉचर म्हणुन ठेवण्यात आले होते.

अंधेरी रेल्वे स्टेशन बाहेर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेयांची पाहणी करीत असताना हवालदार जाधव व सचिन सावंत यांना आपल्याला पाहिजे असलेला इसम नेहमीची सॅक बॅग पाठिला लावुन रेल्वे स्टेशनमधुन बाहेर येवुन पायी चालत जात असल्याचे दिसले, पोलिस नाईक सचिन सावंत व पोलिस हवालदार जाधव यांची खात्री झाली की, आपल्याला पाहिजे असलेला संशयीत चोर हा तोच असुन तो बाईकवर बसत असतानाच पाठी मागुन पळत जावुन दोघांनी फिल्मी स्टाईलने संशयीत चोरास पकडले. त्याची विचारपूस केली असतां
त्याने आपले नांव राजेंद्र रमेश पटेल असे सांगीतले त्याची तपासणी केली असता त्याचे सॅक बॅगमध्ये घरफोडी करण्याची हत्यारे मिळुन आली अधिक चौकशी करता त्यांने मिरा भाईंदर परिसरात केलेल्या गुन्हयांची कबुली देवुन मालाची विल्हेवाट त्याचा साथीदार रोहीत बाळकृष्ण रेशीम, याचे मदतीने केली असल्याची कबुली दिल्याने त्या दोघींवर नवघर पोलीस ठाणे या गुन्हयात १८.१२.२०१९ रोजी अटक करण्यात आली असुन दोघांना २५ डिसेंबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलियो.तपासा दरम्यान आरोपींकडून या वर्षांतील घरफोडीचे एकुण २१ गुन्हे उघडकीस आणुन त्यातील एकुण ३६ लाख १० हजार रुपये किंमतीचे १ हजार ०३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीणे, १०,०००/- रुपये किमतीची चांदीचे दागीणे असा एकुण ३६ लाख २० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलाय...

बाईट १ : शिवाजी राठोड, पोलिस अधिक्षक, ठाणे ग्रामीणConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.