ETV Bharat / state

भिवंडी लोकसभा: कपिल पाटील विरुद्ध सुरेश टावरे काँटे की टक्कर, वंचित आघाडीमुळे रंगत - arun sawant

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जात आहे. येथून युतीकडून पुन्हा भाजपचे कपिल पाटील हे तर आघाडीकडून काँग्रेसचे सुरेश टावरे हे मैदानात उतरलेत.

भिवंडी लोकसभा
author img

By

Published : Apr 19, 2019, 11:20 AM IST

ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जात आहे. येथून युतीकडून पुन्हा भाजपचे कपिल पाटील हे तर आघाडीकडून काँग्रेसचे सुरेश टावरे हे मैदानात उतरलेत. तर वंचित आघाडीकडून अरुण सावंत हे निवडणुक लढवत असल्याने भिवंडी लोकसभेसाठी रंगत निर्माण झाली आहे.

२००९ ला लोकसभेतील मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर भिवंडी हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यावेळी काँग्रेसच्या सुरेश टावरे यांनी भाजपच्या जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत खासदार सुरेश टावरे यांना डावलून कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांना जातीचे गणित मांडत काँग्रेसने तिकीट दिले. मात्र, मोदी लाटेत काँग्रेसचे गणित बिघडले. अन कपिल पाटील विजयी झाले. त्यावेळी मनसेच्या तिकिटावर सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना ९३ हजार ६४७ मते मिळाली होती.

पक्षीय बलाबल

भिवंडी लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये ३ जागेवर भाजपचे वर्चस्व आहे. तर २ ठिकाणी शिवसेना व एका जागेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.

भिवंडी पश्चिम - महेश चौगुले (भाजप)
कल्याण पश्चिम - नरेंद्र पवार (भाजप)
मुरबाड - किशन कटोरे (भाजप)
भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे (शिवसेना)
भिवंडी पूर्व - रुपेश म्हात्रे (शिवसेना)
शहापूर - पांडूरंग दरोरा (राष्ट्रवादी)

गेल्या दोन ते तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपची पत घसरली आहे. त्याचा फायदा घेत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी अघोषित युती करून सत्ता स्थापन केली आहे. उदा. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीशी घरोबा करत शिवसनेने जिल्हा परिषदेत अध्यक्षपद पटकवाले. तर भिवंडी महापालिकेत शिवसनेने काँग्रेसला मदत करत काँग्रेसला महापौर तर सेनाला उपमहापौरपद मिळवले.

काँग्रेसची सारी भिस्त ही भिवंडी शहरातील मुस्लिम मतांवर आहे. भिवंडी शहराची ओळख कामगारांचे शहर म्हणून आहे. तर भिवंडीसह इतर ठिकाणी मुस्लिम, दलित आदिवासी, कुणबी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. कॉग्रेस व भाजपच्या मतावर डोळा ठेवून वंचित बहुजन आघाडीने कुणबी समाजाचे डॉ. अरुण सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

२०१४ ची परिस्थिती

भिवंडी लोकसभा निवडणुकीत २०१४ साली कपिल पाटील यांनी आयत्यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवली. मोदी लाटेत ते तब्बल ४ लाख ११ हजार मते मिळवत विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना ३ लाख १ हजार ६२० मते मिळाली होती. १ लाख मतांच्या फरकाने कपिल पाटील हे विजयी झाले होते. आता पुन्हा युतीकडून कपिल पाटील हे निवडणूक लढवत आहेत. मात्र, यावेळी शिवसैनिक त्यांना मदत करणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. भिवंडी लोकसभा निवडणुकीचे सारे गणित शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.

मतदारसंख्या एकूण - 18 लाख 58 हजार 247
पुरुष मतदार - 8 लाख 37 हजार 218
स्त्री मतदार - 40 टक्क्यांच्या आसपास
कुणबी - ३७ टक्के
मुस्लिम - २१ टक्के
आगरी - १५ टक्के
दलित व अन्य समाज - २७ टक्के

मातब्बर नेत्यांची बंडखोरांची माघार

निवडणुका जाहीर होताच २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील आणि युतीच्या विरोधात शिवसेनेचे सुरेश म्हात्रे या दोघांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केले होते. मात्र, अपक्ष लढून भाजपचे खासदार कपिल पाटील यांना मात देऊ शकत नाही. त्यामुळे सुरेश म्हात्रे यांनी अर्ज मागे घेत, भाजपला विरोध कायम ठेवत काँग्रेसला मदतीचा हात दिला. तर विश्वनाथ पाटील यांना यावेळी काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत, भाजपला साथ देण्याचे ठरवले आहे. यामुळे एक बंडखोर भाजपच्या विरोधात तर दुसरे काँग्रेसच्या प्रचारात उतरले आहेत.

वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. अरुण सावंत यांना निवडणूक रिंगणात उतरवून कुणबी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. तर बहुजन समाज पार्टी व समाजवादी पार्टीने उमेदवार मैदानात उतरवला आहे. या सर्व निवडणूक आखाड्यात खरी लढत युती व आघाडीच्या उमेदवार यांच्यातच रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.