ETV Bharat / state

धक्कादायक! ठाण्यात सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या - पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) निवृत्त अधिकारी मोहम्मद सादिक मोहम्मद शेख यांनी आपल्या राहत्या घरी डोक्यात रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

Retired RTO officer commits suicide in Thane
धक्कादायक! ठाण्यात सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
author img

By

Published : Sep 27, 2020, 7:03 AM IST

ठाणे - ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) निवृत्त अधिकाऱ्याने राहत्या घरी डोक्यात रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोहम्मद सादिक मोहम्मद शफी शेख ( वय 68 ) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आर.एस. शिरतोडे यांनी दिली.

माहिती देताना पोलीस अधिकारी....

ठाणे पश्चिमेकडील कॅसलमिल येथील विकास काॅम्प्लेक्समध्ये तिसऱ्या मजल्यावर मोहम्मद सादिक मोहम्मद शफी शेख हे त्यांच्या 45 वर्षीय मुलासोबत राहत होते. त्यांची पत्नी त्यांच्यापासून विभक्त होऊन नेरळ येथे राहते. शुक्रवारी दुपारी मुलगा घरात झोपला असताना त्यांनी स्वतःच्या परवानाधारी रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडली. यात शेख यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती राबोडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची नोंद राबोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शेख यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - ठाण्यात नगरसेवकाच्या मुलाची हत्या; संपत्तीच्या वादातून सावत्र भावाचे कृत्य

हेही वाचा -'कृषी विधेयकातील अनेक मुद्दे काँग्रेसच्याही जाहीरनाम्यातील, मग विरोध का?'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.