ETV Bharat / state

निवृत्त अधिकाऱ्याच्या मनाचा मोठेपणा! निवृत्तीवेतनाच्या पैशातून साडेसहा लाखांचे पालिकेला दिले व्हेंटिलेटर - Retired Mohan Kulkarni donates ventilators news

कोरोनाच्या काळात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर अशा सगळ्याची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. अशातच अंबरनाथमधील सेवानिवृत्त मोहन कुलकर्णी यांच्या मनाचा मोठेपणा समोर आला आहे. त्यांनी आपल्या रिटायरमेंटच्या पैशातून अंबरनाथ नगरपालिकेला व्हेंटिलेटर दान केला आहे. मोहन कुलकर्णी यांनी यासाठी आपल्या निवृत्तीच्या वेतनातून साडेसहा लाख रूपये खर्च केले आहेत.

thane
ठाणे
author img

By

Published : Apr 29, 2021, 7:32 PM IST

ठाणे : सध्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर अशा सगळ्याची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. अशातच अंबरनाथमध्ये एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मनाचा मोठेपणा समोर आला आहे. त्यांनी आपल्या रिटायरमेंटच्या पैशातून अंबरनाथ नगरपालिकेला व्हेंटिलेटर दान केला आहे. त्यांच्या या सेवा भावनेतून प्रेरणा घेत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही आपले एका दिवसाचे वेतन नगरपालिकेच्या कोविड फंडात जमा केले आहे. ही रक्कम सुमारे 5 लाख रूपये इतकी आहे. या रक्कमेतून 5 बायपप मशीनची खरेदी केली जाणार असल्याचे नगर पालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत रसाळ यांनी सांगितले. तर मोहन कुलकर्णी असे व्हेंटिलेटर दिलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे.

सेवानिवृत्त मोहन कुलकर्णी यांनी अंबरनाथ महानगरपालिकेले दिले साडेसहा लाखांचे व्हेंटिलेटर

आरोग्य सेवेसाठी मनापासून इच्छा

मोहन कुलकर्णी अंबरनाथच्या खेर सेक्शन विभागात वास्तव्याला आहेत. अंबरनाथच्या बोरॅक्स मोरारजी कंपनीत काम करणारे कुलकर्णी 2003साली निवृत्त झाले. 2019साली दुर्दैवाने कुलकर्णी यांच्या पत्नीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांना आरोग्य सेवेसाठी काहीतरी योगदान देण्याची मनापासून इच्छा होती. त्यातच सध्याची कोरोना परिस्थिती पाहता जमा असलेल्या पुंजीतून अंबरनाथ पालिकेला एखादी रुग्णवाहिका घेऊन द्यावी, असा विचार त्यांच्या मनात आला. अंबरनाथ नगरपालिकेने कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी 100 आयसीयू असलेल्या 800 खाटाचे रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयासाठी सामाजिक संस्थांनी मदत करण्याचे आवाहन अंबरनाथ नगरपालिकेकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अंबरनाथ मधील मोहन कुलकर्णी यांनी आपल्या निवृत्तीच्या वेतनातून साडेसहा लाख खर्च केले आणि रुग्णालयाला व्हेंटिलेटर दान केला.

व्हेंटिलेटर घेण्यासाठी बँकेतून कर्ज
कुलकर्णी यांच्याकडे व्हेंटिलेटर घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी दीड लाख रुपये बँकेतून कर्ज घेतलं आणि त्यांच्याकडे असलेल्या जमा पुंजीत भर टाकली. अंबरनाथ नगरपालिकेला तब्बल साडेसहा लाख रुपयांचा व्हेंटिलेटर घेऊन दान केला. हा व्हेंटिलेटर अंबरनाथ नगरपालिकेच्या डेंटल कॉलेज कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात येणार आहे. त्याचा अंबरनाथमधील रुग्णांना फायदा होणार आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे मुंबई टी-२० लीग पुढे ढकलली, मिलिंद नार्वेकर यांची ट्विटरद्वारे माहिती

हेही वाचा - कोव्हॅक्सीन लस उत्पादनासाठी हाफकिनला १५४ कोटींचे अनुदान, मंत्रिमंडळाचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.