ETV Bharat / state

'तुमच्यासाठी झटणाऱ्या यंत्रणांचा आदर करा, घरात राहून त्यांना सहकार्य करा!' - ठाणे

पोलीस आयुक्त फणसालकर यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज मुंब्र्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची त्यांनी भेट घेतली.

corona thane
शहर पोलीस आयुक्त विवेक फणसकर
author img

By

Published : Mar 31, 2020, 7:40 PM IST

ठाणे - संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट पसरले आहे. या विषाणूला पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने काही कायदे लागू केले आहेत. मात्र, नागरिकांकडून या कायद्यांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. लॉकडाऊन असतानाही काही नागरिक विनाकारण शहरात फिरत आहे. पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे. त्यामुळे, शहरात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नागरिकांनी घरीच रहावे, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त विवेक फणसालकर यांनी केले.

माहिती देताना पोलीस आयुक्त विविक फणसालकर

पोलीस आयुक्त फणसालकर यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज मुंब्र्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची त्यांनी भेट घेतली. पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे सर्वजण कोरोनाविरुद्ध लढत आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन शहर पोलीस आयुक्त विवेक फणसालकर यांनी केले.

हेही वाचा- Coronavirus: गृहनिर्माणमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड लाॅकडाऊन संपेपर्यंत करणार एक लाख फूड पॅकेट्सचे वाटप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.