ETV Bharat / state

भिवंडीतील मदर डेअरीमध्ये स्थानिकांना रोजगार द्या; ग्रामस्थांचे आंदोलन

author img

By

Published : Jan 22, 2020, 7:46 PM IST

गोवे सरवली ग्रामपंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहत आहे. सध्या या ठिकाणी मदर डेअरीच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून प्रकल्प उभारला जात आहे. या नवीन प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी मिळावी, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांनी केली.

गोवे सरवली येथील आंदोलन
गोवे सरवली येथील आंदोलन

ठाणे - भिवंडी तालुक्यातील गोवे सरवली येथील औद्योगीक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) राष्ट्रीय दुग्धविकास विभागातर्फे दुग्धप्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारली आहे. त्याठिकाणी मदर डेअरी फुड अँड व्हेजिटेबल या कंपनीकडून काम सुरू आहे. या डेअरीमध्ये स्थानिक ग्रामस्थांना नोकरीसाठी प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी गोवे सरवलीच्या ग्रामस्थांनी मदर डेअरीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले आहे.

गोवे सरवलीतील ग्रामस्थांनी मदर डेअरीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले

गोवे सरवली ग्रामपंचायत हद्दीत औद्योगिक वसाहत आहे. येथेच महाराष्ट्र दुग्ध विकास महामंडळाची डेअरी ही व्यावसायिक कंपनी आहे. या कंपनीचे हस्तांतर राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी मदर डेअरीच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून प्रकल्प उभारला जात आहे. या नवीन प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सातत्याने केली. मात्र या मागणीला प्रशासनकडून नकार देण्यात आला आहे.

हेही वाचा - माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, ..म्हणजे मी भारतीय नाही का?
प्रशासनाने नकार दिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला. संतप्त ग्रामस्थांनी मदर डेअरीच्या प्रवेशद्वाराबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कंपनी प्रशासनासोबत चर्चा केली. सोमवारपर्यंत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

Intro:kit 319Body:
मदर डेअरीत नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्यासाठी स्थानकांचे डेअरी समोर आंदोलन

ठाणे : भिवंडी तालुक्यातील गोवे सरवली येथील एमआयडीसी मध्ये राष्ट्रीय दुग्धविकास विभागातर्फे दुग्धव्यवसाय करण्याची यंत्रणा उभारली असून मदर डेअरी फुड अँड व्हेजिटेबल या कंपनी कडून या ठिकाणी काम सुरू आहे. मात्र या मदर डेअरीत नोकऱ्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी ग्रामपंचायत गोवे येथील ग्रामस्थांनी मदर डेअरी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करू तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत .
भिवंडी - कल्याण रोड येथील सरवली गोवे ग्रामपंचायत क्षेत्रात एमआयडीसी औद्योगिक वसाहत असून त्याच्या प्रवेशद्वारा वर महाराष्ट्र दुग्ध विकास महामंडळाचे डेअरी व्यवसाय करणारी कंपनी असून त्याचे हस्तांतर राष्ट्रीय दुग्ध विकास म्हसमंडळा कडे झाल्यानंतर या ठिकाणी मदर डेअरीच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून प्रकल्प उभारला जात आहे. लवकरच डेअरीचा प्रकल्प सुरू होणार असल्याने स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी मिळावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही प्रशासनकडून त्यास नकार दिला आहे. त्यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये असंतोष पसरला असून मदर डेअरीच्या प्रवेशद्वारा बाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. यावेळी माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कंपनी प्रशासनासोबत चर्चा करून येत्या सोमवारपर्यंत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Byte :- जयेश पाटील ( ग्रामस्थ -)

Conclusion:bhiwnadi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.