ETV Bharat / state

लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर बलात्कार, दगाबाज प्रियकर गजाआड - कल्याण गुन्हे वृत्त

तरुणीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करणाऱ्या प्रियकराला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

Rape on  lover
लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर बलात्कार
author img

By

Published : Nov 20, 2020, 8:08 PM IST

ठाणे - २० वर्षीय तरुणीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यांनतर तिला लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय प्रियकराने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हि घटना कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी दगाबाज प्रियकरावर बलात्कारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. रोहन ढेकणे (वय,२१,रा. सापव, डोंबिवली) असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या दगाबाज प्रियकराचे नाव आहे.

६ वर्षांपासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले अन दगाबाजाने दिला धोका -

आरोपी रोहन याची पीडित तरुणीशी ६ ते ७ वर्षापासून मैत्री होती. याच मैत्रीचा फायदा दगाबाज रोहन उचलत आधी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यांनतर तिला प्रेमाची भुरळ घालून लग्नाचे आमिष दाखवले. त्यामुळे पीडिता दगाबाजाच्या अमिषाला बळी पडली. त्यांनतर गेल्या चार महिन्यापूर्वी प्रियकराने पीडितेच्या राहत्या घरातच तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीच्या घरात व त्याच्या मित्राच्याही घरात पीडितेवर वारंवार अत्याचार केला.

विशेष म्हणजे दगाबाज प्रियकर व पीडित तरुणीचे काही महिन्यापूर्वी भांडण झाले होते. मात्र त्याने त्यावेळी माफी मागितली होती. त्यामुळे पुन्हा प्रेमाचे सूत जुळून आले आणि याच संधीचा फायदा घेऊन दगाबाजाने बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान, पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दगाबाज विरोधात तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३७६, (२), (एन), ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी रोहनला अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. ई. गोडे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.