ETV Bharat / state

Bageshwar Dham In Thane: बागेश्वर बाबा चौथ्यांदा ठाणे जिल्ह्यात; अंबरनाथमध्ये रामकथा आणि हनुमान कथेचे आयोजन - Dhirendra Shastri Maharaj

संपूर्ण देशभरात चर्चेत असलेले बागेश्वर धाम सरकार मध्य प्रदेश येथील धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे, ठाणे येथील अंबरनाथ शहरातील प्राचीन शिव मंदिराच्या मैदानात ७ ते ९ मे रोजी रामकथा आणि हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

Bageshwar Dham Program
धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा कार्यक्रम
author img

By

Published : May 6, 2023, 3:29 PM IST

माहिती देताना गुलाबराव करंजुळे पाटिल

ठाणे : नागरिकांना आता तीन दिवस धिरेंद्र शास्त्री महाराज यांचा कार्यक्रम अनुभवता येणार आहे. देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पीठाधीश्वर बागेश्वर धाम सरकार यांचे मंदिर व आश्रम भिवंडी तालुक्यातील अंजुरदिवे येथील इंडियन कॉर्पोरेशन माईलस्टोन येथे उभारण्यात येणार आहे. त्यातच दिव्य बालाजी सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर बाबा चौथ्यांदा ठाणे जिल्ह्यात येत असून अंबरनाथ शहरातील प्राचीन शिव मंदिराच्या मैदानात त्यांच्या रामकथा आणि हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची पुनरावृत्ती नको: उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त असताना आणि नवी मुंबईतील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उष्माघात बळीमुळे गालबोट लागलेले असताना, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची पुनरावृत्ती नको अशी नागरिकांची मागणी आहे. त्यातच बागेश्र्वर बाबाच्या प्रवचनाचे आयोजन अंबरनाथ मधील शिवमंदिराच्या प्रांगणात करण्यात असून ७ ते ९ मे दरम्यान रामकथा आणि हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

आठ वर्षांपासून नागरिकांशी संवाद: विशेष म्हणजे यापूर्वी ६ व ७ नोव्हेंबर २०२२ रोजी ठाणे जिल्ह्यात बागेश्वर धामकडून भिवंडीत दिव्य बालाजी दरबार भरविण्यात आला होता. त्यावेळी उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी इंडियन कॉर्पोरेशन माईल स्टोन येथे बागेश्वर धामचे मंदिर व आश्रम उभारण्याचा संकल्प केला होता. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतपीठाच्या माध्यमातून शेकडो वर्षांपासून नागरिकांचे दु:ख व समस्या निवारण करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. सध्याचे पीठाधीश्वर पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडून आठ वर्षांपासून हजारो नागरिकांशी संवाद साधला जातो. दर मंगळवारी व शनिवारी लाखो भाविकांकडून बागेश्वर धाममध्ये दर्शन घेतले जाते.

दोन ते अडीच लाख भाविक उपस्थित राहणार: या प्रवचनाला दोन ते अडीच लाख भाविक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. मात्र आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायमच चर्चेत असणारे बागेश्र्वर बाबा अंबरनाथमध्ये नेमके काय वक्तव्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र त्याचबरोबर लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची कोणती व्यवस्था आयोजकांनी केली आहे हे देखील पाहणे महत्वाचे आहे. यापूर्वी शिवामांदिर फेस्टीव्हलसाठी शिवमंदिराच्या प्रांगणात झालेली गर्दी देखील पोलिसांना आवरणे मुश्किल झाले होते. यामुळे पोलीस या कार्यक्रमाला होणारी गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार हे महत्वाचे आहे.

हेही वाचा-

  1. Bageshwar Dham Sarkar बागेश्वर धामचे सत्य आले समोर बाबांनी स्वीकारले आव्हान करून दाखवला असा चमत्कार
  2. Dhirendra Shastri अखेर धीरेंद्र शास्त्री यांना झुकावेच लागले ट्विट करून साई भक्तांची मागितली माफी
  3. Dhirendra Shastri on Sant Tukaram Maharaj बागेश्वर बाबा बरळले संत तुकाराम महाराजांबद्दल केले आक्षेपार्ह विधान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.