ठाणे - ज्या तृतीयपंथीयांनी सांस्कृतिक, सामाजिक, कायदेशीर लढाई लढत तृतीयपंथीयाना न्याय, हक्क मिळवून दिला. अशा तृतीयपंथीयांच्या नावाने दृश्यता दिवस जगभर साजरा करण्यात येतो. याच निमित्याने 'ट्रांसजेंडर डे ऑफ व्हिजिबिलिटी जागितिक स्तरावर 31 मार्चपासून सप्ताह सुरू झाला असून याच सप्ताहानिमित्ताने ( World Transgender Week ) उल्हासनगर शहरातही शेकडो तृतीयपंथीय एकत्र येत रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान 'भागो, भागो किन्नर आया' हे पथनाट्य ( Street Play ) सादर करण्यात आले होते.
तृतीयपंथीय समाजाला भारतीय संविधानाने दिलेले हक्काच्या अधिकाराची माहिती व्हावी यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. हेच अधिकार त्यांना समाजात पुन्हा आणण्यास मदत मिळणार असल्याचे वान्या फाउंडेशन अध्यक्ष रेखा ठाकूर, किन्नर अस्मिता सामाजिक संस्थाच्या तमन्ना केणी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली उल्हानसागर कॅम्प नंबर 1 मधील 24 नंबर शाळेतून सुरू होऊन गोलमैदान समोर तृतीयपंथीयांना समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीवर आणि त्यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर करण्यात येऊन महापालिकेच्या समोर रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत उल्हासनगर महापालकेच्या उपआयुक्त जमीर लेंग्रेकर, प्रियंका राजपूत, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे, यांच्यासह दोनशेहून अधिक तृतीयपंथीयांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा - shopkeeper beaten by women : महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या दुकानदाराला महिलांनी दिला बेदम चोप