ETV Bharat / state

...म्हणून न्यायाधीश बदलावा, अश्विनी बिद्रे-गोरेंच्या पतीचा साक्ष देण्यास नकार - पतीचा साक्ष देण्यास नकार

मुख्य आरोपीचे वकील व न्यायाधीश यांनी पूर्वी सोबत काम केल्याने खटल्याचा न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. म्हणून साक्ष नोंदविण्यास नकार दिल्याचे आश्विनी बिद्रे-गोरे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले.

अश्विनी बिद्रे-गोरे
अश्विनी बिद्रे-गोरे
author img

By

Published : Feb 1, 2020, 12:50 PM IST

Updated : Feb 1, 2020, 1:15 PM IST

नवी मुंबई - सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांड प्रकरणी अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी साक्ष देण्यास नकार दिला असून त्यांनी न्यायाधीश राजेश आस्मर यांच्यावरच आक्षेप घेतला आहे.

बोलताना राजू गोरे

अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांचे वकील विशाल भानुशाली व हत्या प्रकरणाची सुनावणी देणारे न्यायाधीश राजेश अस्मर यांनी सोबत काम केले असल्यामुळे या खटल्यात आपणास न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे हा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग करावा, अशी मागणी अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केली असून, त्यांनी शुक्रवारी (दि. 31 जानेवारी) पनवेल सत्र न्यायालयात न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यापुढे साक्ष नोंदविण्यास नकार दिला, असे पत्रही गोरे यांनी न्यायाधीशांना दिले आहे. तसेच पूर्वीचे न्यायाधीश मालशेट्टी यांच्याकडे हा खटला देण्यात यावा, अशी लेखी मागणी राजू गोरे यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

हेही वाचा - मनसेच्या आंदोलनात अनेकांनी सहभागी व्हावे - सरदेसाई

शुक्रवारी सुनावणीपूर्वीच आरोपी व त्यांचे वकील गैरहजर असल्यामुळे अन्य वकिलांनी दुसरी तारीख मिळावी म्हणून मागणी केली होती. मात्र, साक्षीदार हजर असल्याने न्यायालयाने साक्ष नोंदविण्यास सूचित केले. पण, मुख्य साक्षीदार राजू गोरे यांनी मला साक्ष नोंदवायची नाही, असे सांगितले. न्यायालयाने आपले म्हणणे लेखी द्या, असे सूचित केल्यानंतर गोरे यांनी आपले मत लेखी दिले. मात्र, त्या लेखी मताचे वाचन केल्यावर हे मत रेकॉर्डवर घेण्यास नकार देऊन, साक्षीदार साक्ष देण्यास निरुत्साही आहे, अशी नोंद न्यायाधीशांनी केली. यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आक्षेप घेतला व साक्षीदाराने लेखी दिलेले मत रेकॉर्डवर घ्या, अशी विनंती केली.

हेही वाचा - दरोडेखोरांनी भर दिवसा घरातून लुटला १ कोटी ८६ लाखांचा ऐवज

मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला असे या खटल्याचे मुख्य साक्षीदार व अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 14 फेब्रुवारीला होणार आहे.

हेही वाचा - पनवेल-ठाणे मार्गावरून धावली पहिली एसी लोकल, रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन

Intro:अश्विनी बिंद्रे यांच्या पतीचा साक्ष देण्यास नकार.….

न्यायमूर्तींवरचं घेतला आक्षेप...

नवी मुंबई:

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे हत्याकांड प्रकरणी अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी साक्ष देण्यास नकार दिला असून त्यांनी न्या.राजेश आस्मर यांच्यावरच आक्षेप घेतला आहे.
अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांचे वकील विशाल भानुशाली व हत्या प्रकरणाची सुनावणी देणारे न्या राजेश अस्मर यांनी सोबत काम केले असल्यामुळे या खटल्यात आपणास न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे हा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग करावा, अशी मागणी अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केली असून, त्यांनी शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात न्या. राजेश अस्मर यांच्यापुढे साक्ष नोंदवून घेण्यासही नकार दिला.असे पत्रही गोरे यांनी न्यायाधीशांना सादर केले आहे. तसेच पूर्वीचे न्यायाधीश मालशेट्टीं यांच्याकडे हा खटला देण्यात यावा अशी लेखी मागणी राजू गोरे यांनी उच्च न्यायालयात केली आहे.
शुक्रवारी सुनावणीपूर्वीच आरोपी व त्यांचे वकील गैरहजर असल्यामुळे अन्य वकिलांनी दुसरी तारीख मिळावी म्हणून मागणी केली होती.मात्र साक्षीदार हजर असल्याने न्यायालयाने साक्ष नोंदविण्यास सूचित केले, मात्र मुख्य साक्षीदार राजू गोरे यांनी मला साक्ष नोंदवायची नाही असे सांगितले. न्यायालयाने आपले म्हणणे लेखी द्या असे सूचित केल्यावर, गोरे यांनी आपले मत लेखी दिले.मात्र त्या लेखी मताचे वाचन केल्यावर हे मत रेकॉर्डवर घेण्यास नकार देऊन, साक्षीदार साक्ष देण्यास निरुत्साही आहे, अशी नोंद न्यायाधीशांनी केली.यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आक्षेप घेतला व साक्षीदाराने लेखी दिलेले मत रेकॉर्डवर घ्या अशी विनंती केली.
मात्र न्यायालयाने त्यास नकार दिला असे या खटल्याचे मुख्य साक्षीदार व अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले.या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 14 फेब्रुवारीला होणार आहे.

Byts

राजू गोरे (अश्विनी बिंद्रे यांचे पती)Body:.Conclusion:.
Last Updated : Feb 1, 2020, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.