ETV Bharat / state

आदीच्या रेल्वे अर्थसंकल्पातील रखडलेली कामे तरी पूर्ण व्हावीत..!

author img

By

Published : Jan 31, 2021, 3:31 PM IST

Updated : Jan 31, 2021, 5:05 PM IST

आदीच्या अर्थसंकल्पातील रखडलेली कामे पूर्ण होतील, या अपेक्षेने रेल्वे मंत्र्यांनी कल्याण-कसारा तिसरी मार्गिका, कल्याण आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-कर्जत तिसरी मार्गिका, कल्याण-बदलापूर चौथी मार्गिका, ही कामे पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, या मागणीसह अन्य मागण्यांचाही रेल्वे अर्थसंकल्पात समावेश करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ठाणे
ठाणे

ठाणे - दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्प केंद्र सरकारकडून संसदेत सादर करून रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधांसह नव्या कामांच्या घोषणा करून प्रवाशांचा सुखाचा प्रवास होईल म्हणून रेल्वेमंत्री सांगतात, मात्र २०११ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणांच्या कामांची अद्यापही पूर्तता झाली नसल्याचे कल्याण कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघावत यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. किमान आदीच्या अर्थसंकल्पातील रखडलेली कामे पूर्ण होतील, या अपेक्षेने रेल्वे मंत्र्यांनी कल्याण-कसारा तिसरी मार्गिका, कल्याण आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-कर्जत तिसरी मार्गिका, कल्याण-बदलापूर चौथी मार्गिका, ही कामे पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, या मागणीसह अन्य मागण्यांचाही रेल्वे अर्थसंकल्पात समावेश करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

ठाणे
रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या...

२०११ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये कल्याण-कसारा तिसरी मार्गिका, कल्याण आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-कर्जत तिसरी मार्गिका, कल्याण-बदलापूर चौथी मार्गिका, कल्याण रेल्वे यार्डाचे रिमॉडलिंग, या कामांची घोषणा केली होती. प्रत्यक्षात २०१६ साली या कामांना सुरुवात झाली. मात्र, गेली ३ ते ४ वर्षांमध्ये रेल्वेच्या या नियोजित प्रकल्पांची कामे संथगतीने सुरू आहेत. दुसरीकडे मध्य रेल्वेच्या ठाण्यापुढील प्रवाशांच्या सोयीसाठी नवी रेल्वे स्थानके, होम प्लॅटफॉर्म, रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल, सरकते जिने आणि वाढीव शटलसेवा आवश्यक आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात प्रवासी क्षमता वाढवणाऱ्या प्रकल्पांना भरघोस तरतुदीची अपेक्षा रेल्वे प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात प्रवासी संघटनांकडून या प्रलंबित प्रकल्पांसाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये कामांच्या पूर्तता करण्याची मागणी केली आहे.

रेल्वे रुग्णालय वाशिंदमध्ये करण्याची मागणी ..

मध्य रेल्वेच्या ठाण्यापुढील कल्याण आणि इगतपुरी याच स्थानकानजीक रेल्वेचे सुज्जस मोठी रुग्णालय आहेत. याच धर्तीवर कल्याण ते इगतपुरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या वाशिंद रेल्वे स्थानकानजीक रेल्वेचे रुग्णालय असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापसून आमची प्रवासी संघटना करीत असल्याचे राजेश घनघावत यांनी सांगत, किमान यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तरी या रुग्णालयाला मंजुरी मिळावी म्हणून मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गुरवली रेल्वे स्थानकाच्या मागणीकडे ५० वर्षांपासून दुर्लक्ष ..

कल्याण - कसारा मार्गावरील असलेल्या टिटवाळा ते खडवली रेल्वे स्थानकादरम्यान गुरवली रेल्वे स्थानकाची मागणी गेल्या ५० वर्षांपासून स्थानिक नागरिकांसह कल्याण कसारा - कर्जत रेल्वे प्रवासी संघटना करीत आहेत. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने किमान यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तरी गुरवली रेल्वे स्थानकाच्या उभारणीचा समावेश करावा, अशी मागणी पुन्हा रेल्वे मंत्र्याकडे केली आहे. विशेष म्हणजे मुंबई ते ठाणे दरम्यान २ ते ३ किलोमीटर अंतरावर नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात आली आहे. तर गेल्याच महिन्यात अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे स्थानक दरम्यान चिखलोली रेल्वे स्थानकाला मंजुरी देऊन त्याचे उभारणीचे कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, ५० वर्षांपासून गुरवली रेल्वे स्थानकाच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असून किमान यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तरी गुरवली रेल्वे स्थानकाला स्थान मिळावे, अशी आग्रही मागणी राजेश घनघावत यांनी रेल्वे मंत्र्याकडे केली आहे.

गेल्या ८ वर्षांपासून मध्यरेल्वे मार्गावर शटल सेवांची मागणी

मध्य रेल्वेच्या ठाण्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी शटल सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या ८ वर्षापासून प्रवासी संघटनांकडून केली जात असून कर्जत, कसारा, कल्याण आणि इतर स्थानकांतून ठाण्यापर्यंत मोठ्या संख्येने शटल सेवा सुरू करणे आवश्यक आहे. ठाण्यापुढे मध्य रेल्वे मार्गावर सुमारे ४० लाख प्रवाशी रेल्वे प्रवास करीत असून मुंबईतील लोकसंख्या आणि इतर राज्यातून आलेल्या लोंढ्यामुळे सद्याच्या स्थितीत सुरू असलेली मध्य रेल्वे प्रवासी वाहतूक सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे शटल सेवांची मागणीसह पंधरा डब्यांच्या लोकल कल्याण पलीकडच्या स्थानकांमध्ये सुरू करणे, यासारख्या मागण्याही पूर्ण होण्याची आवश्यकता असून या सर्व मागण्या उद्या होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट असतील, अशी अपेक्षा राजेश घनघाव यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

Last Updated : Jan 31, 2021, 5:05 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.