ठाणे : भिवंडी महापालिकेची निवडणूक (Bhiwandi Muncipal Corporation) मनसे ताकदीने उतरण्यासाठी शहरातील अशोक नगर येथील मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackreay inaugrates MNS Pr Office Bhiwandi) यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र कार्यालयाचे उद्घाटन करून मनसैनिक तसेच पत्रकरांशी संवाद न साधताच अर्ध्यातासाभरात राज ठाकरे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
Raj Thackrey in Bhiwandi : कार्यकर्त्यांना न भेटताच गेले राज ठाकरे - राज ठाकरे आले भिवंडीत
अशोक नगर येथील मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackreay inaugrates MNS Pr Office Bhiwandi) यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, यावेळेस ते पत्रकारांशी संवाद न साधताच पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
Raj Thackrey in Bhiwandi
ठाणे : भिवंडी महापालिकेची निवडणूक (Bhiwandi Muncipal Corporation) मनसे ताकदीने उतरण्यासाठी शहरातील अशोक नगर येथील मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackreay inaugrates MNS Pr Office Bhiwandi) यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र कार्यालयाचे उद्घाटन करून मनसैनिक तसेच पत्रकरांशी संवाद न साधताच अर्ध्यातासाभरात राज ठाकरे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
राज ठाकरे भिवंडीत येत असल्याने मनसैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी मुंबई - नाशिक मार्गावरील बायपास नजीक मोठी बाईक रॅली काढत त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले. तर कार्यलयाच्या उदघाटन प्रसंगीही मनसे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यातच कार्यालयाचे उद्घाटन करून कार्यकर्त्यांशी संवाद न साधताच राज ठाकरे परतल्याने मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला दिसला. यावेळी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, अभिजित पानसे, भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी, प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे, मनविसेनेचे संतोष साळवी, परेश चौधरी व अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते