ETV Bharat / state

राज ठाकरेंच्या सभेवर पुन्हा पावसाचे सावट? - maharashtra assembly election

कल्याण आणि भिवंडीतील आज होणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांना पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे पुणे पाठोपाठ आता भिवंडी आणि कल्याण येथील राज ठाकरे यांच्या सभेवर पावसाचे पाणी फेरल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

सभेचे ठिकाण
author img

By

Published : Oct 12, 2019, 7:26 PM IST

Updated : Oct 12, 2019, 8:02 PM IST

ठाणे - कल्याण आणि भिवंडीतील शनिवारी होणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांना पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे पुणे पाठोपाठ आता भिवंडी आणि कल्याण येथील राज ठाकरे यांच्या सभेवर पावसाचे पाणी फेरल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून आले.

ठाणे जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण परिसरात परतीच्या पावसाने सायंकाळच्या सुमारास गेल्या 15 दिवसांपासून धुमाकूळ घालत नागरिकांना जेरीस आणले आहे. त्यातच निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने परतीच्या पावसाचा फटका सर्वच उमेदवारांना बसला आहे. आज सायंकाळी सात वाजता भिवंडीतील अंजुर फाटा येथे राज यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तर कल्याणमधील फडके मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले, या दोन्ही सभा यशस्वी करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन तयारी केली. मात्र, सभा सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच पावसाने विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मैदानात पावसाचे पाणी साचलेले असून आता ह्या सभा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांकडून आघाडीच्या जाहीरनाम्याची खिल्ली, म्हणाले 'हे' एकच आश्वासन दिले नाही

कल्याण-डोंबिवली हा मनसेचा गड राहिला असून 2009 साली कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण या दोन मतदारसंघातून मनसेचे उमेदवार विजयी झाले होते. तर त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 29 नगरसेवक निवडून येत विरोधी पक्षनेते ही पद पटकावले होते. यामुळे आज होणाऱ्या कल्याणच्या राज ठाकरे यांच्या सभेला महत्त्व प्राप्त झाले. पण, पावसामुळे सभा होणार नाही याकडे मनसैनिक आणि नागरिकांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटाजवळच उलटला ट्रक; प्रवाशांमध्ये खळबळ

Intro:kit 319

Body:राज ठाकरेंच्या सभेवर पुन्हा पावसाचा फटका

ठाणे : कल्याण आणि भिवंडीतील आज होणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांवर पावसाचा फटका बसला आहे, त्यामुळे पुणे पाठोपाठ आता भिवंडी आणि कल्याणातील राज ठाकरे यांच्या सभेवर पावसाचे पाणी फेरल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून आले ,

ठाणे जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण परिसरात परतीच्या पावसाने सायंकाळच्या सुमारास गेल्या 15 दिवसापासून धुमाकूळ घालत नागरिकांना जेरीस आणले आहे त्यातच निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने परतीच्या पावसाचा फटका सर्वच उमेदवारांना बसला आहे आज सायंकाळी सात वाजता भिवंडीतील अंजुर फाटा येथे राज यांची सभा आयोजित करण्यात आली होती तर कल्याणमधील फडके मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले , ह्या दोन्ही सभा यशवी करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन तयारी केली, मात्र सभा सुरू होण्याच्या काही तास शिल्लक असतानाच पावसाने विजेच्या कडकडाट सहमुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे मैदानात पावसाचे पाणी साचलेले असून आता ह्या सभा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे,

जन्म कल्याण-डोंबिवली हा मनसेचा गड राहिला असून 2009 साली कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण या दोन मतदारसंघातून मनसेचे उमेदवार विजयी झाले होते तर त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 29 नगरसेवक निवडून येत विरोधी पक्षनेते ही पद पटकावले होतं, यामुळे आज होणाऱ्या कल्याणच्या राज ठाकरे यांच्या सभेला महत्त्व प्राप्त झाले ,

Conclusion:कल्याण
Last Updated : Oct 12, 2019, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.