ETV Bharat / state

रेल्वे स्थानकाकतील गर्दीचा रेटा लक्षात घेता, रेल्वे सुरक्ष यंत्रणा सतर्क - thane breaking news

राज्य शासनाने 15 ऑगस्ट लोकल सेवा चाकरमान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कोविडच्या दोन लसी घेतलेल्याना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे रेल्वे प्रवासासाठी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार आहे. तसेच 15 ऑगस्टच्या दृष्टीनेही कुठला अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून मध्य रेल्वे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोहमार्ग पोलिसांनी ठाणे ते कल्याण परिसराच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरील प्रवासाच्या बॅगसह लगेज तपासणी सुरू केली.आहे.

म
author img

By

Published : Aug 14, 2021, 7:22 PM IST

Updated : Aug 14, 2021, 9:17 PM IST

ठाणे - राज्य शासनाने 15 ऑगस्ट लोकल सेवा चाकरमान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कोविडच्या दोन लसी घेतलेल्याना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे रेल्वे प्रवासासाठी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार आहे. तसेच 15 ऑगस्टच्या दृष्टीनेही कुठला अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून मध्य रेल्वे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोहमार्ग पोलिसांनी ठाणे ते कल्याण परिसराच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरील प्रवासाच्या बॅगसह लगेज तपासणी सुरू केली आहे. शिवाय सीसीटीव्ही आणि इतर सुरक्षा संबंधित गोष्टी तपासल्या जाणार असल्याने गेल्या दोनपासून रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन लोहमार्ग पोलिसांनी सुरू केले. तर गर्दीचा रेटा पाहता अतिरिक्त रेल्वे पोलीस तैनात करण्यात आले.

रेल्वे स्थानकातील दृश्य

गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवलीत सर्वाधिक लोकलचे पास वितरित

15 ऑगस्टपासून प्रवास करण्याची राज्य सरकराने परवानगी दिली आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रवाशांनी मास्क घालण्यासह इतरही सर्व नियमांचे पालन केले पाहिजे या देखरेखीसाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले. तर दीड वर्षाने मुंबईच्या उपनगरीय क्षेत्रातील खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा दिल्याने प्रवाशी आनंद व्यक्त करीत असून या निर्णयाचे स्वागत करत आहेत. चाकरमानी गेल्या दोन दिवस रेल्वेचा पास मिळावा म्हणून रेल्वे खिडकीवर रांगा लावल्या आहेत. तर ज्यांचे क्यूआर कोड आहेत. अशा प्रवाशांनी कालपर्यत 18 हजारांपेक्षा अधिक लोकल प्रवासाचे पास वितरित करण्यात आले. यामध्ये मध्य रेल्वेच्या मार्गावरील गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थनाकात सर्वाधिक पास काढले तर त्याखालोखाल कल्याण, बदलापूर आणि ठाण्यामध्येही सर्वाधिक पास रेल्वे प्रशासनाकडून वितरित केले आहेत, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भालोडे यांनी दिली.

दीड वर्षानंतर रेल्वे स्थानकात गर्दीचा रेटा उसळणार

आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भालोडे यांच्या म्हणण्यानुसार जीआरपी पथक आणि आमची बैठक झाली असून या बैठकीत ठाण्यापासून पुढे कसारा आणि कर्जत परिसरापर्यंतच्या सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी आली. तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी, रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांचे पास आणि मास्क तपासण्यात मदत करण्यासाठी रेल्वेचे अतिरिक्त पथक तैनात करण्यात आले. दीड वर्षानंतर स्थानकात गर्दी होईल म्हणून सर्व सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कार्यरत आहेत किंवा नाही. याचीही तपासणी केली. शिवाय श्वान पथके आणि सीसीटीव्ही आधारे पाळत ठेवणारी टीम सज्ज आहे. सर्व यंत्रणा अखंड आणि ठीक आहेत हे तपासण्यासाठी आम्ही दोन तीन दिवसांपासून मॉक टेस्ट घेत असल्याचे सांगण्यात आले.

जीआरपी, आरपीएफ, श्वान पथकासह ड्रोन कॅमेराचा वापर

मध्य रेल्वेच्या 31 स्थनाकात नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह प्रवाशांचा प्रवास सुखाचा होण्यासाठीही योजना आखत असून जीआरपीसह सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. पुढे त्यांनी सांगितले की, हे सीसीटीव्ही कॅमेरे चेहरे ओळखण्याच्या तंत्रज्ञानासह पूर्व स्थापित केले जातील ठाणे आणि जवळील परिसर आणि रेल्वे परिसर येथे आगामी स्वातंत्र्यदिनापासून ड्रोन कॅमेराच्या वापराविषयी माहिती दिली. तसेच रेल्वे अधिकाऱ्यासह नागरी पोलिसांसह कडक अँटीसबॉटेज तपासले जातील तश्या सूचना जीआरपी, आरपीएफ, श्वान पथकाला दिल्या जात असल्याचेही आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भालोडे यांनी सांगितले.

हेही वाचा - 16 वर्षीय मुलीला रात्रभर घरात डांबून बलात्कार.. आरोपीला सात वर्षे कारावासाची शिक्षा..

Last Updated : Aug 14, 2021, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.