ETV Bharat / state

तुम्हीही खरेदी करुन शकता 'राफेल'; तेही केवळ हजार रुपयात - Rafale kite makarsankrant news

कामोठे परिसरात चक्क राफेलची विक्री होत आहे. तुम्ही १००० रुपयांत स्वतःच्या हक्काच्या राफेल विमानाचे मालक होऊ शकता.

तुम्हीही खरेदी करुन शकता 'राफेल'; तेही केवळ हजार रुपयात

author img

By

Published : Jan 13, 2021, 9:23 AM IST

ठाणे- पनवेलच्या कामोठे परिसरात चक्क राफेलची विक्री होत आहे. तुम्ही १००० रुपयांत स्वतःच्या हक्काच्या राफेल विमानाचे मालक होऊ शकता. यावर आश्चर्य करण्याचे काही कारण नाही. आकाशात घिरट्या घालणार असलेले हे खरे खुरे राफेल नसून कामोठे मधील एका विक्रेत्याने मकरंसंक्रातीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी राफेल विमानाच्या आकारातील पतंगाची निर्मिती करून ते विक्रीला ठेवले आहे.

तुम्हीही खरेदी करुन शकता 'राफेल'; तेही केवळ हजार रुपयात
राफेल पंतगांमुळे लहान मुलांत उत्साह:कामोठे वसाहतीमधील सेक्टर ९ परिसरात स्तुतीशा गृह उद्योग नावाने चालवण्यात येत असलेल्या दुकानात ही पतंग विक्रीकारिता उपलब्ध आहेत. या नाविन्यपूर्ण पतंगामुळे बच्चे कंपनी भलतीच खुश झाली आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळत असून या पतंगाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. प्रथमच राफेलच्या आकाराची पंतग विक्रीला :शालेय जीवनापासून केवळ हौशी खातर विविध आकारातील पतंग बनवणारे श्रीकांत रेपाळे यांनी यंदा प्रथमच विक्री करिता पतंगाची निर्मिती केली आहे. रेपाळे यांनी विमानाच्या आकारातील पतंगासोबत स्माईली, गोल्डन कोटेड पतंग, सिल्वर कोटेड पतंग आशा नावाचे सध्या पतंग तयार केले असून, १ फुटापासून ते १० फुटपर्यंत आकार असलेल्या या पतंगांची विक्री ५० रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंत करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.