ठाणे - नागरिकत्व कायद्याविरोधात कल्याण येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी झटका दिला आहे. विशेष म्हणजे आंदोलनकर्त्यांना कुठलेही कारण न देता, मंडपातील बत्तीगुल केल्याने आंदोलनकर्त्यांनी शेकडो मोबाईलच्या उजेडात अंदोलन सुरू ठेवले होते.
केंद्र सरकारच्या एनआरसी, सीएए, एनपीआर, कायद्याविरोधात गेल्या १३ दिवसापासून दिल्लीच्या शाहीनबागच्या धर्तीवर कल्याणच्या केडीएमसी ग्राउंडवर धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र, सोमवारी रात्रीच्या सुमारास आंदोलन सुरू असताना महावितरणने कुठलेही कारण न देता वीजपुरवठा खंडित केला. मात्र, आंदोनकर्त्यांनी मोबाईलच्या उजेडात त्यांचे आंदोलन सुरूच ठेवले होते.
हेही वाचा - 'हा देश जेवढा तुझ्या बापाचा, तेवढाच माझ्याही बापाचा'
दुसरीकडे या धरणे आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे शनिवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान आहे आणि बारापर्यंत त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत भाषण दिले. त्यामुळे न्यायायलाच्या आदेशाचे पालन न केल्याने पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, नागरिकत्व कायदा जोपर्यंत केंद्र सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत या कायद्याविरोधात धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे, आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'समूह विकास योजनेला फडणवीसांची मंजुरी; मात्र, भूमिपूजनाचे आमंत्रण द्यायला सेना विसरली'