ETV Bharat / state

Thane Crime : स्कूलबसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग, तर शिक्षिकेकडून सातवीच्या विद्यार्थिनीला मारहाण - Private school

ठाण्यातील एका शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत शिक्षिकेकडून विद्यार्थिनीला बेदम मारहाण झाली आहे. यामुळे पालक धास्तावले आहेत.

बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग
बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग
author img

By

Published : Aug 12, 2023, 2:27 PM IST

ठाणे : भिवंडीत सुरू असलेल्या खासगी शाळांमध्ये सध्या गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका इंग्रजी शाळेच्या बस कंडक्टरला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत किरकोळ कारणावरुन शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे पालकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिली घटना : पोलिस आणि इतरांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील जुना आग्रा रोड परिसरात असलेल्या एका खासगी इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी दोन अल्पवयीन सख्या बहिणी रोज बसमधून शाळेत येत होत्या. त्यावेळी बस कंडक्टर या विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य करत असे. दरम्यान ५ ऑगस्टलाही बसमधून शाळेतून घरी जात असताना विद्यार्थिनींसोबत बस कंडक्टरने अश्लील वर्तन केले. घरी पोहोचताच विद्यार्थिनींनी आपल्या कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पीडितेच्या कुटुंबीयांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन बस कंडक्टरवर विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बस कंडक्टरचा शोध घेऊन त्याला अटक केली. पीडित कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वीही आरोपीने निरपराध विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केले होते. याबाबत शाळा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र तक्रारीनंतरही त्या बस कंडक्टरमध्ये सुधारणा झाली नसल्याने त्याचे प्रकार वाढतच चालले होते.

शिक्षिकेकडून विद्यार्थिनीला मारहाण : दुसऱ्या एका घटनेत शांतीनगर येथील एका प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीला वर्गात बेंचवर बसताना होणारा त्रास विद्यार्थिनीने पालकांना सांगितल्याने आई-वडिलांनी याबाबत शिक्षकेकडे तक्रार केल्याने या गोष्टीच्या रागातून शिक्षिकेने विद्यार्थिनीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यामुळे विद्यार्थिनीच्या आईने मुख्याध्यापकांकडे तक्रार करुन संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली. मात्र मुख्याध्यापकांनी शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी विद्यार्थिनीचा वर्गच बदलल्याची माहिती विद्यार्थिनीच्या आईने दिली आहे. मात्र याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. या दोन्ही घटनांमुळे शहर वर्तुळात खासगी शाळांची ही दोन्ही कृत्ये चर्चेत आली आहेत.

हेही वाचा-

  1. Minor Girl Rape : जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार
  2. Nanded Honour Killing : आत्महत्या केल्याचा बनाव रचत मुलीचा जन्मदात्याकडून खून, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.