ठाणे: ठाण्यात भाजपचा वाढता प्रभाव पाहता येथे आता भाजपने चाचपणी सुरू केली आहे. कल्याण मतदार संघावरील आपली दावेदारी सोडताना भाजपकडून ठाण्यामध्ये तीन उमेदवारांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह आमदार संजय केळकर आणि भाजप थिंक टँकचा एक प्रमुख चेहरा विनय सहस्त्रबुद्धे यांच्यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ठाणे: येथील लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नेमणूक झाली. तेव्हाच अनेक राजकीय भुवया उंचावल्या गेल्या होत्या. कल्याण लोकसभा मतदार संघासाठी आग्रही असलेल्या भाजप पक्षाने हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोडला. अशी चर्चा सुरू असताना भाजपने आता ठाणे लोकसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सहा भाजप नेत्यांवर सोपविण्यात आलेली आहे.
विनय सहस्रबुद्धेंचे नाव या कारणाने चर्चेत: ठाणे लोकसभा मतदारसंघावर सर्वांत मोठी दावेदारी असलेले संजीव नाईक यांना मात्र कल्याण मतदारसंघाची जबाबदारी दिल्याने त्यांचा पत्ता आपोआप कट केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. संजीव नाईक हे एक मातब्बर नेते असून ठाणे लोकसभा मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. तरी देखील त्यांना असे डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर सध्या चर्चेत असलेले विनय सहस्त्रबुद्धे हे भाजपच्या थिंक टॅंक मधील एक प्रमुख नेते आहे. त्यांचे नाव चर्चेत आल्याने या मतदार संघातील रंगत वाढली आहे. विनय सहस्रबुद्धे हे अत्यंत अनुभवी आणि संवेदनशील नेते आहे. याच कारणाने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेऊ शकतील, असा अंदाज आल्यानेच त्यांचे नाव चर्चेत आल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.
श्रीकांत शिंदे यांची होणार अडचण: दुसरीकडे जर ठाण्याची जागा भाजपने मागितली तर श्रीकांत शिंदे यांची मोठी अडचण होणार आहे. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये ती जागा भाजपने मागितली असून श्रीकांत शिंदे ठाण्यातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळेस भाजपने ठाण्याची देखील जागा मागितली तर श्रीकांत शिंदे यांची मोठी अडचण होणार आहे.
हेही वाचा: