ETV Bharat / state

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 'त्या' गर्भवती महिलेला केले रुग्णालयात दाखल

मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात यश आले आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 'त्या' गर्भवती महिलेला केलं रूग्णालयात दाखल
author img

By

Published : Jul 27, 2019, 7:47 PM IST

ठाणे - वांगणीजवळ पुराच्या पाण्यात तब्बल 15 तास अडकलेल्या मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये एक 9 महिन्यांची गर्भवती महिलाही अडकली होती. गाडीतच या महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या आणि तिच्या नातेवाईकांची एकच धांदल उडाली. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात यश आले आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 'त्या' गर्भवती महिलेला केलं रूग्णालयात दाखल
रेश्मा कांबळे, असे या महिलेचे नाव आहे. रेश्मा या मुंबईहून महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला निघाल्या होत्या. प्रसूतीसाठी तेथील रुग्णालयात त्यांनी नाव नोंदवले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ पुराच्या पाण्यात अडकली आणि त्यात रेश्मा याही अडकल्या. रेश्मा या डी-1 बोगीमध्ये होत्या. तिथेच रात्री त्यांना प्रसुतीवेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी अनेकांशी संपर्क साधला. बराचवेळ गेल्यानंतर रेश्मा यांच्यापर्यंत मदत पोहोचली.

त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना त्यांना सुखरूपपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेश्मा यांच्याप्रमाणेच या एक्स्प्रेसमधून आणखीही 8 गर्भवती महिला प्रवास करत होत्या. त्यांनाही मदतीसाठी बराचवेळ धडपड करावी लागली व मोठा मनस्तापही सहन करावा लागला, अशी माहिती आहे.

दरम्यान, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, नौदल आणि एनडीआरएफने यशस्वी मोहीम राबवत गाडीतील सर्व 700 प्रवाशांची सुखरूपपणे सुटका केली आहे. जवळपास ३ ते ५ फूट पाण्यात ही एक्स्प्रेस अडकली होती.

Intro:पावसाचा कहरBody: वांगणीजवळ पुराच्या पाण्यात तब्बल १५ तास अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये एक ९ महिन्यांची गर्भवती महिलाही अडकली होती. गाडीतच या महिलेला प्रसववेदना सुरू झाल्या आणि तिच्या नातेवाईकांची एकच गाळण उडाली. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात यश आले आहे.
रेश्मा कांबळे असे या महिलेचे नाव आहे. रेश्मा या मुंबईहून महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला निघाल्या होत्या. प्रसूतीसाठी तेथील रुग्णालयात त्यांनी नाव नोंदवले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ पुराच्या पाण्यात अडकली आणि त्यात रेश्मा याही अडकल्या. रेश्मा या डी-१ बोगीमध्ये होत्या. तिथेच रात्री त्यांना प्रसववेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी अनेकांशी संपर्क साधला. बराचवेळ गेल्यानंतर रेश्मा यांच्यापर्यंत मदत पोहोचली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना त्यांना सुखरूपपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रेश्मा यांच्याप्रमाणेच या एक्स्प्रेसमधून आणखीही ८ गर्भवती महिला प्रवास करत होत्या. त्यांनाही मदतीसाठी बराचवेळ धडपड करावी लागली व मोठा मनस्ताप सहन करावा लागला, अशी माहिती आहे. यास अधिकृत दुजोरा मात्र मिळालेली नाही.
दरम्यान, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, नौदल आणि एनडीआरएफने यशस्वी मोहीम राबवत गाडीतील सर्व १ हजार ५० प्रवाशांची सुखरूपपणे सुटका केली आहे. जवळपास ३ ते ५ फूट पाण्यात ही एक्स्प्रेस अडकली होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.