ETV Bharat / state

सेना नेत्यांवर मनसेकडून टीका, शिवसेना महिला आघाडी आक्रमक - thane news

ठाणे जिल्ह्यात सेना-मनसेमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेत्यांवर मनसेकडून खालच्या स्तरावर टीका केली जात असल्याचा आरोप करत मनसेने हे थांबवले नाही तर सेनेकडून आरे ला कारे उत्तर देण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Mira Bhayandar
निवेदन देताना
author img

By

Published : Aug 18, 2020, 8:25 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - शिवसेना-मनसे पुन्हा शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेत्यांवर मनसेकडून सोशल मीडियावर टीका सुरू आहे. त्यामुळे आता हे थांबले पाहिजे अन्यथा आरेला कारे करणे आम्हालाही येते, असा खणखणीत इशारा मीरा भाईंदर शिवसेना महिला आघाडीने दिला. भाईंदर पूर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी शशिकांत भोसले यांनी पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.

माहिती देताना महिला आघाडी
मनसेचे नेते आणि सेना नेते गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करत आहेत. त्यामुळे सेना-मनसेत वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाईंदरमध्ये सेनेच्या महिला आघाडी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आता हे थांबवा अन्यथा याचे दुष्परिणाम मनसेला भोगावे लागतील. मनसे पदाधिकारी समाज माध्यमांवर सेना नेत्यांवर खालच्या पातळीची टीका करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर महिला आघाडीने मनसे नेत्यांना इशारा देत आम्हालाही आरेला कारे करता येते. हे असंच सुरू राहिली तर आम्हाला शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागेल व त्याला सर्वस्वी मनसे जबाबदार राहील, असे महिला आघाडीकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील मनसे-सेनेचा राजकीय वाद रंगणार हे चित्र दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.