ETV Bharat / state

Thane Municipal Action: बड्या नेत्याच्या पत्नीने घेतली मिठाई आणि दुकानावर ठाणे महापालिकेने केली कारवाई; काय होता वाद?

ठाण्यात आणि मुंबई नवी मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेल्या एका मिठाई व्यापाऱ्यावर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाई केली आहे. तीस वर्षे जुन्या असलेल्या या दुकानाच्या बाहेरील बसण्याचे कठडे तोडून प्रशासनाने आपण किती कार्यकुशल आहोत याचे पुरावे दिले आहेत.

author img

By

Published : May 27, 2023, 10:30 PM IST

Thane Municipal Action
प्रशांत कॉर्नर

ठाणे: शहरातील एका मोठ्या नेत्याच्या पत्नीने गुरुवारी रात्री मिठाई खरेदी करण्यासाठी प्रशांत कॉर्नर गाठले. या ठिकाणी वाहन पार्किंगवरून तिचा काही जणांशी वाद झाला. दुसऱ्या दिवशी या मिठाईच्या दुकानावर अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. हे दुकान मागील अनेक दशकांपासून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण भागातील ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. ठाण्यातील ही आगळीवेगळी कारवाई आता चर्चेचा विषय ठरली आहे.

आव्हाडांची नाराजी: एका नेत्याच्या पत्नीने मिठाई खरेदी करण्यासाठी गेल्यावर झालेला मानापमान नाट्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.

हलाखीतून उभारला व्यवसाय: मराठी उद्योजक अशी ओळख कमवलेल्या प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी अनेक वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला. एका मराठी माणसांचा व्यवसाय हा सातासमुद्रा पार गेला. दरवर्षी सणानिमित्त तयार करण्यात येणारी मिठाई ही परदेशातही जाऊ लागली आहे. दिवाळी, दहीकाला उत्सव, दसरा, मकर संक्रांत या सर्व सणांमध्ये येथे विशेष मिठाई बनविली जाते. त्यामुळे दुकानाला दररोज हजारोच्या संख्येने ग्राहक भेट देतात.

प्रशांत कॉर्नरच्या 20 शाखा: प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानांच्या ठाणे, मुंबई भागात जवळपास 20 शाखा आहेत. प्रशांत कॉर्नर या नावाने तयार करण्यात आलेली मिठाई ड्रायफ्रूट्स आणि इतर पदार्थ हे लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचविले जातात. एवढा मोठा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकाला त्याच्या जातीच्या कारणावरून त्रास दिला जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. दुकान मालक दलित असल्याने राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावरून त्यांचा छळ केला जात असल्याची चर्चा जोरात आहे.

अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई: उल्हासनगर शहरात वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अनेक ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला अनधिकृतपणे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. सोमवारी अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमध्ये २५ पेक्षा जास्त हातगाड्या आणि टपऱ्या तोडण्यात आल्या.

फेरीवाल्यांचा विरोध: या कारवाईला काही फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस बंदोबस्तात त्यांची समजूत काढल्याने हा विरोध मावळला. शहरात वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अनेक ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला अनधिकृतपणे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. फुटपाथवर देखील स्टॉल, टपऱ्या उभारण्यात आलेल्या आहेत. यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.