ETV Bharat / state

Thane Crime : भिवंडीत पोलिसांनी ९ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकत १६ गुन्ह्यांची केली उकल; लाखोंचा मुद्देमाल जप्त - ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याखालील 9 आरोपींना अटक

शांतीनगर पोलीस ठाण्याच्या ( Shantinagar police station action ) पथकाने गस्ती दरम्यान ९ सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १६ गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विशेष म्हणजे या ९ सराईत गुन्हेगारांमध्ये मालेगावात गुन्हा करून ८ वर्ष फरार आरोपीचा सामावेश आहे.

शांतीनगर पोलीस ठाणे
शांतीनगर पोलीस ठाणे
author img

By

Published : Jul 28, 2022, 4:46 PM IST

Updated : Jul 28, 2022, 4:54 PM IST

ठाणे - भिवंडी शहरात वाढता गुन्हेगारांचा आलेख पाहता शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी रात्रीची गस्त वाढण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एकट्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या ( Shantinagar police station action ) पथकाने गस्ती दरम्यान ९ सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १६ गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विशेष म्हणजे या ९ सराईत गुन्हेगारांमध्ये मालेगावात गुन्हा करून ८ वर्ष फरार आरोपीचा सामावेश आहे. तर एका आरोपीकडून ८ किलो १०० ग्राम वजनाचा गांजाही जप्त करण्यात आला. एकूण ९ आरोपीकडून आतापर्यत १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये दागिने, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल, दुचाक्या, रिक्षाही जप्त करण्यात आल्या.

प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त

मुद्देमाल हस्तगत : भिवंडी शहरात महिनाभरापासून जबरी चोरी, वाहन चोरी, घरफोडी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून चोरट्यांनी अक्षरशःधुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर शांतीनगर पोलिसांनी शिताफीने तपास करून १६ गुन्ह्यांची उकल करीत ९ आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी करून चोरट्यांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर उकल केलेल्या गुन्ह्यांमध्ये जबरी चोरीचे २, घरफोडीचे ३ गुन्हे, वाहन चोरीचे १० गुन्हे आणि अंमली पदार्थ विरोधी १ गुन्हा असे एकूण १६ गुन्हे उघड केले आहेत.

हेही वाचा - Gang Rape In Nagpur District: अकरा वर्षीय मुलीवर आरोपींचा सामूहिक बलात्कार

Last Updated : Jul 28, 2022, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.