ठाणे : १५ जून पासून शाळा, महाविद्याल सुरू होताच नशेखोरीचा गोरखधंदा करणारे शाळा, महाविद्याल परिसरात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय डोंबिवली स्टेशन परिसर व सार्वजनिक ठिकाणी सिगरेट तंबाखू सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. केवळ दोन तासात ५० जणांवर सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू सेवन केल्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याची बजावली नोटीस आहे. तर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
पोलिसांची कडक कारवाई - डोंबिवली शहराची संस्कृतिक नगरी म्हणून जगभरात ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली व आसपासच्या परिसरात पोलिसांनी गांजा , चरस, एमडी पावडर अश्या अंमली पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त करून नशेखोरीचा गोरखधंदा करणाऱ्या तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र तरी देखील डोंबिवलीच्या काही भागात अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचे पोलिसांच्या छापेमारीतून उघडकीस आले. त्यामुळे डोंबिवली शहर नशामुक्त करण्यासाठी विशेष मोहिम शहारत पोलिसांकडून राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आता रसार्वजनिक स्त्यावर उभे राहून सिगारेट ओढणंही महागात पडणार आहे.
नशा करणाऱ्यांना थेट न्यायालयात हजर करणार - गेल्या काही दिवसांपासून नशामुक्त शहर करण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध मोहिम राबवली जात असतानाच, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली पोलिसांकडून विशेष मोहिम राबवली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची नशा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून रस्त्यावर कुठेही उभं राहून सिगारेट ओढणाऱ्यांनाही आणि गुटखा , तंबाकू खाणाऱ्यावर आता चाप बसणार आहे. अशी कोणत्याही नशा करणाऱ्यांना थेट न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
विविध पथकं नेमत कारवाई - कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ आणि डोंबिवलीचे एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी डोंबिवली परिसरातील डोंबिवलीतील रामनगर, विष्णुनगर, टिळक नगर आणि मानपाडा या चारही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या चारही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी विविध पथकं नेमत कारवाईची सुरवात केली. या कारवाईत बीट मार्शल आणि परिसरामध्ये पोलिसांची व्हॅन पाठवत कारवाई सुरू केली. विशेषतः स्टेशन परिसर, बस स्टॉप, ओपन जीम, बगीचे किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही सिगारेट ओढताना, तंबाखू खाताना किंवा कोणतेही अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळल्यास त्यांना पोलीस ठाण्यात नाही तर थेट न्यायालयात जावं लागणार आहे.
पोलीस पथकांचे नागरिकांकडून कौतुक - नशा करणाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी कायदेशीर नोटीस देण्यात येते. त्यानंतर न्यायालय आरोपीला काय शिक्षा द्यायची तो निर्णय न्यायालय घेणार आहे. विशेष म्हणजे कारवाईच्या पहिल्याच दिवशी दोन तासात ५० जणांवर सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू सेवन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली, तर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मोहीम राबविणारे पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे ही विशेष मोहीम राबविणाऱ्या पोलीस पथकांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा - Pune Crime : पत्नीवर पतीसह मित्रांकडून सामूहिक बलात्कार; गुन्हा दाखल