ETV Bharat / state

Thane Crime : शारीरिक भूख भागविण्यासाठी वेश्या वस्तीत आलेल्या चार गुन्हेगारांवर पोलिसांची झडप

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील हनुमान टेकडी भागात शारीरिक भूख भागविण्यासाठी आलेल्या चार गुन्हेगारांवर पोलिसांनी आज (मंगळवारी) झडप घालून अटक केली आहे. या गुन्हेगारांकडून पिस्तुल, गावठी कट्ट्यासह कार जप्त करण्यात आली आहेत. आशिष विनोद बर्नवाल(वय, २० वर्षे), मोह. जुनैद मोह. नदीम कस्सार (वय, १८ वर्षे), अहमद अली हसन शा (वय २० वर्षे) आणि अतिरुपती अजयकुमार पाणिग्रही (वय २२ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगार चौकडीची नावे आहेत.

Criminals Arrested In Thane
आरोपीस अटक
author img

By

Published : May 16, 2023, 5:59 PM IST

ठाणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही गुन्हेगार नवी मुंबई परिसरातील दिघा गावात राहतात. रविवारी १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चारही गुन्हेगार वासनेच्या उद्देशाने हत्यारांसह भिवंडीतील खदानरोड येथील हनुमान टेकडी भागातील वेश्यावस्तीत एका कारमधून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने भिवंडी शहर पोलिसांनी सापळा रचून या चारही गुन्हेगारांना झडप घालून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस पोलीस पथकाला मिळून आले.

१८ मे पर्यंत पोलीस कोठडी: त्यानंतर पोलीस शिपाई महेंद्र उबाळे यांच्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आली. चारही गुन्हेगारांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर हे गुन्हेगार कुठल्या उद्देशाने हत्यारांसह आले होते. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भामरे करीत आहेत.

'सेक्स वर्कर'वर चाकूहल्ला: यापूर्वीही २३ फेब्रुवारी २०२२ रोजी याच वेश्या वस्तीत घुसून एका 'सेक्स वर्कर' महिलेकडे हफ्ता मागण्यात आला होता. या गुंडांचे मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करणाऱ्या एका ४० वर्षीय सेक्स वर्कर महिलेच्या पोटात धारदार चाकू भोसकून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून गुंडाना अटक केली होती. मुजाहीद रहनुउद्दीन शेख (वय, २९ रा. मक्का मजीद शेजारी भिवंडी), अरबाज जावेद शेख (वय २४, रा. रावजीनगर, भिवंडी) असे अटक केलेल्या सराईत गुंडांची नावे आहेत, तर तिसरा आरोपी अल्पवयीन होता.

हेही वाचा:

  1. Trimbakeshwar Temple Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
  2. Kalicharan Maharaj News: समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने कालीचरण महाराजांसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; भाजपने फेटाळले आरोप
  3. Shevgaon Traders Business Stop: समाजकंटकांनी केलेल्या दंगलीविरुद्ध शेवगाव शहरात व्यापाऱ्यांची 'बंदची हाक'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.