ETV Bharat / state

Police Raid On Gambling Den : ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच जुगार माफियांना अटक - पाच जुगार माफियांना अटक

ठाण्यातील भिवंडीत ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. यात पाच जुगार माफियांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहन सरयुग यादव ३८(नवीवस्ती), जहिरोद्दीन कमरुद्दीन अन्सारी (४६), नियाज अखलाक शेख (३२), मोफिस कासिम सय्यद (३७) आणि राजू पवार, अशी अटक करण्यात आलेल्या जुगार माफियांची नावे आहेत.

Police Raid On Gambling Den
Police Raid On Gambling Den
author img

By

Published : Jan 12, 2023, 9:37 PM IST

ठाणे - जिल्ह्यात स्मार्टफोनवर सद्या ऑनलाईन जुगाराचा सुळसुळाट पहायला मिळत असून टपऱ्या, दुकानांमध्ये बिनदिक्कत चालणाऱ्या ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यांवर अनेक जण खेचले जात आहेत. यात नोकरदार, व्यावसायिकांचा समावेश तर आहेच, शिवाय अशा जुगाराच्या आहारी गेलेल्यांमध्ये शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरणा अधिक असल्याचे दिसून येत आहे.

जुगार अड्ड्यावर छापा - भिवंडी शहरातील नवी वस्ती परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी पाच जुगार माफियांना अटक केली आहे. मोहन सरयुग यादव ३८(नवीवस्ती), जहिरोद्दीन कमरुद्दीन अन्सारी (४६), नियाज अखलाक शेख (३२), मोफिस कासिम सय्यद (३७) आणि राजू पवार, अशी अटक करण्यात आलेल्या जुगार माफियांची नावे आहेत.

किंग नावाच्या ऍप्लिकेशन ऑनलाइन जुगार - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण रोडच्या नवीवस्ती परिसरात ट्रॅफिक स्वीटसमोरील वीरेंद्र झेरॉक्स दुकानाच्या पहिल्या मजल्यावर किंग नावाच्या ऍप्लिकेशन ऑनलाइनच्या नावाने संगणकावर रौलेट ऑनलाइन जुगार खेळला जात होता. माहिती मिळताच पोलिसांनी सदर जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले.

मुद्देमाल जप्त - शिवाय त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचा संगणक, ५०० रुपये किमतीचा राऊटर, २ हजार ८५० रुपये रोख असा एकूण १३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या जुगाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ अन्वये भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राणे करीत आहेत.

जुगार माफियांमध्ये खळबळ - एकीकडे सायबर पोलिसांच्या ही बाब लक्षात आली आहे. काही तक्रारीसुद्धा त्यांच्यापर्यंत गेल्या आहेत. पण कायद्याने बंदी नसल्याने विविध शहारातील अनेक भागांत ऑनलाईन जुगाराचे अड्डे सर्रास सुरु आहेत. यात तरूणाई दिवसेंदिवस अडकत चालली आहे. यातूनच तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. त्यामुळे भिवंडी पोलिसांनी ऑनलाईन जुगार माफियांच्या गोरखधंदाला आळा घालण्यासाठी कंबर कसली असून काल भिवंडीतील नवी वस्ती भागात असलेल्या ऑनलाइनच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत संगणक, राऊटर, जुगारासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य रोख रक्कमेसह जप्त करून पाच जणांना अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे ऑनलाइनच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांतील माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

जुगार अड्ड्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न - अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांतून हेच जुगार माफीया कुप्रसिद्धी गुंड टोळ्या पोसत आहे. मात्र त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या माफीयांनी आपल्या अड्ड्यांचे जाळे स्टेशन परिसरात, तसेच सर्वसामान्यांची लोकवस्ती असलेल्या भागात थाटले आहेत. या जुगारात महाविद्यालयीनच नव्हे तर, शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुरफटत चालली असून देशाचे उज्वल भवितव्य उध्वस्त होताना दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.