ठाणे : कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख आणि डीबी पथकाचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कल्याण पूर्वीतील नांदिवली गावाच्या हद्दीत असलेल्या 'कशिश' बारवर गुरुवारी ३० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अचानक छापेमारी केली. त्यावेळी एका हिंदी गाण्यांवर तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत ग्राहकांसमोर बारबालांचा नाच सुरू होता. या छापेमारीत पोलिसांनी २८ बालबालांसह इतरांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ ४ गायिकांना ठेवण्याची परवानगी असताना तब्बल २८ बारबाला बारचालकाने ठेवल्या होत्या. शिवाय बारबाला आकर्षक व तोकडे कपडे घालून अश्लील नाच करत होत्या.
28 महिला ताब्यात: कशिश बारमध्ये बारचे चालक-मालक, कर्मचारी आणि ग्राहकांकडून त्या बारबालांना अश्लील नृत्य करण्यास संगनमताने प्रोत्साहित केल्याचे आढळले. तसेच ऑर्केस्ट्रा बारमध्ये नाचण्यास प्रतिबंध असल्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात २८ महिलासह बार मालक समेश्वर बहादूर उमाशंकर सिंह, मॅनेजर, वेटर , ग्राहक अश्या २३ पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.
खळबळजनक सत्य समोर : या घटनेने कल्याण डोंबिवली शहरातील ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्रासपणे बारबालांना नाचवले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही 'कशिश' डॉन्स बारवर पोलीस पथकाने ७ वेळा छापेमारी केल्याचे सांगितले जात आहे.
विरारमध्ये सुरू होती छमछम : वसई-विरारमध्ये रिसॉर्टमध्ये बारबालांचा छमछम नाच सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार 5 ऑगस्ट, 2021 रोजी उघडकीस आला होता. विरार पोलीस ठाणे हद्दीतील मांडवी परिसरातील चांदीप येथील मॉस या रिसॉर्ट-बारवर गुरुवारी (5 ऑगस्ट) रात्री बारबालांचा छम-छम डान्स सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रिसार्टवर छापा टाकला. यावेळी बारबालांचा छमछम नाच होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी 15 ग्राहकांवर कारवाई केली. शिवाय त्यांना अटकही करण्यात आली.
16 बारबाला ताब्यात: पोलिसांनी मॉस रिसॉर्ट-बारवर छापा टाकला. येथे काही बारबालाही नाचत असल्याचे दिसले. त्यामुळे जवळपास 16 बारबालांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, 6 ऑगस्टला या सर्व आरोपींना वसई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
हेही वाचा: Threat to Sanjay Raut: संजय राऊतांना धमकी देणाऱ्याचा लागला शोध, गृहमंत्री फडणवीस यांची माहिती