ठाणे - कल्याण-शीळ रस्त्याला असलेल्या दावडी नाक्यावर ड्रीम नाईट लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसानी लॉजवर छापा टाकून लॉज चालकासह चार जणांना अटक केली आहे. तसेच तीन महिलांची सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-शीळ मार्गावरील ड्रीम नाईट लॉजमध्ये मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्याआधारावर मानपाडा पोलिसांच्या पथकाने रविवारी पहाटे पावणे दोन वाजताच्या सुमारास छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी व्ही तंगवेल, सुरेंद्र रविदास, संदीप धोपटे, राजेश ढोले आणि संतोष गौडा या पाच जणांविरोधात पीडित महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तसेच त्यांना पैशाचे आमिष दाखवून लॉजमध्ये बोलून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. अधिक तपास मानपाडा पोलीस करत आहेत.