ETV Bharat / state

Thane Crime : बनावट साबण बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा, ज्वलनशील रसायनाचे १०० ड्रम जप्त; एकास अटक - Raid On Illegal soap factory

भिवंडी तालुक्यातील कांबे गाव परिसरातील तळवली नायक जवळील घरत कंपाऊंडमधील काळा साबण निर्मितीच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी निजामपुरा पोलिसांनी छापा टाकून 60 हजार रुपये किमतीचे 200 लिटर ज्वलनशील रसायनाचे 100 ड्रम जप्त केले आहेत.

Raid Illegal soap factory
Raid Illegal soap factory
author img

By

Published : Apr 25, 2023, 10:40 PM IST

ठाणे : भिवंडी तालुक्यातील कांबे गाव परिसरातील तळवली साबण बनवण्याच्या गोदामावर पोलिसांना छापा टाकून ६० हजार रुपये किमतीचे २०० लिटर ज्वलनशील रसायनाचे १०० ड्रम जप्त केले आहे. तसेच या प्रकरणी एकास अटक केल्याची कारवाई केली आहे. मैनुद्दीन मुनीर अहमद खान (५० रा.मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे ज्वलनशील रसायनांचा साठा करून काळा साबण बनवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बेकायदेशीरपणे रसायने साठवली : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मैनुद्दीन याने संबंधित विभागाचा कोणताही परवाना न घेता भिवंडी तालुक्यातील कांबे गाव परिसरातील धंदा थाटला होता. त्याने तळवली नाक्याजवळील घरत कंपाऊंड येथील गोदामात आपल्या फायद्यासाठी विविध प्रकारचे ज्वलनशील रासायनिक पदार्थ बेकायदेशीररीत्या साठवून ठेवले होते. पोलिसांनी आज (मंगळवारी) टाकलेल्या छाप्यात हा ज्वलनशील पदार्थाचा साठा काळा साबण बनवण्यासाठी वापरला जात असल्याचे आढळून आले. शिवाय, ही रसायने मानवी जीवनास हानी पोहोचवू शकतात. तरी देखील कामगारांना पुरेसे संरक्षण किंवा उपाय योजना न करता आरोपीने त्याच्या गोडाऊनमध्ये विविध प्रकारची ज्वलनशील रसायने बेकायदेशीरपणे साठवली होती. आरोपी मैनुद्दीन याच्या विरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई ज्ञानेश्वर भाईदास कोळी यांच्या फिर्यादी वरून भादविच्या कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर आरोपीचा फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम ४१ (ए) (१) अन्वये जामीनही मंजूर करण्यात आला आहे.

गावकऱ्यांसह जनावरांच्या जीवाला धोका : स्थानिक सूत्रांनुसार भिवंडी तालुक्यातील कांबा गाव, खाडीकिनारी, इतर अनेक ठिकाणी ज्वलनशील रसायनांचा वापर करून काळा साबण बनवण्याचा अवैध धंदा सुरू आहे. त्यावर काही लोक मुंबईहून येथे येऊन काळा साबण बनवतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या गोदामात जमा झालेल्या ज्वलनशील रसायनांमुळे जाळपोळीच्या घटना घडत असून यापासून गावकऱ्यांसह जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा - Ravindra Dhangekar CM : आमदार रवींद्र धंगेकरांना व्हायचे मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटलांना दिले मोठे अव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.