ठाणे - आज होळीचा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जगावर पसरलेले कोरोनाचे संकट झुगारत ठाण्यात देखील होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. आज ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना वाहतूक नियमांबद्दल माहिती दिली. यावेळी पोलिसांनी वाहनचालकांना थांबवून त्यांना रंग लावत अभिनव उपक्रम राबविला.
होळी असो वा रंगपंचमी वाहनचालकांकडून अनेकदा नियमांचे उल्लंघन करण्यात येते. दारु पिऊन गाड्या चालविणे, जोरजोरात हॉर्न वाजवत गाड्या पळविणे, असे प्रकार सर्रास केले जातात. अनेकदा याबाबत पोलिसांकडून कारवाई देखील केली जाते. मात्र, आज ठाणे वाहतूक पोलिसांनी अभिनव पद्धतीने रंगपंचमी साजरी केली.
वाहतूक नियम पाळा, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा, सीट बेल्ट वापरा, मद्यपान करून गाडी चालवू नका, असा संदेश देत वाहनधारकांच्या गाड्या थांबवून वाहतूक पोलीस वाहन धारकांना रंग लावत होळी साजरी केली.
हेही वाचा - इराणमधून भिवंडीत आणलेला 80 टन कांदा सडला, साठवणूकदारावर होणार कारवाई