ETV Bharat / state

दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्रे यांच्यासह सहकाऱ्यांना पोलिसांची अमानुष मारहाण; पोलिसांविरोधात तीव्र संताप - ठाणे अपडेट्स

आतापर्यंत प्रत्येक दिवशी दीड हजारांवर उपाशी गरजूंना जेवण देणाऱ्यावरच उपोषण करण्याची वेळ आल्याची दिव्यातील ही दुदैवी घटना आहे. याबाबत केंद्रे यांनी संबंधित मारहाण करणाऱ्या अज्ञानी पोलिसांवर कडक कारवाई करण्यासाठी ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.

दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्रे यांच्यासह सहकाऱ्यांना पोलिसांची अमानुष मारहाण; पोलिसांविरोधात तीव्र संताप

author img

By

Published : Apr 25, 2020, 7:15 PM IST

ठाणे - सोसायटीमधील भांडण मिटविण्यासाठी दिवा बीट येथील पोलीस चौकीत गेलेल्या समाजसेवक अमोल केंद्रे आणि त्यांचे सहकारी निकम यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात गेल्या 28 मार्चपासून दिव्यातील गरीब जनतेसह पोलिसांच्या जेवणाची नित्यनियमाने काळजी घेणाऱ्या अमोल केंद्रे यांच्यावर झालेल्या मारहाणीचा दिवा परिसरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत प्रत्येक दिवशी दीड हजारांवर उपाशी गरजूंना जेवण देणाऱ्यावरच उपोषण करण्याची वेळ आल्याची दिव्यातील ही दुदैवी घटना आहे. याबाबत केंद्रे यांनी संबंधित मारहाण करणाऱ्या अज्ञानी पोलिसांवर कडक कारवाई करण्यासाठी ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. याबाबत तक्रारीत अमोल केंद्रे यांनी असे म्हटले आहे की, मारहाण करण्यापूर्वी ४ पोलीस बाईकवरुन आले होते. त्यातील एक शिपाई रवी जाधव यांनी अमोल म्हणून आवाज दिला होता. अमोल केंद्रे हे परिचयाचे आहेत तसेच ते परवानगी घेऊन दिवा परिसरात अन्नदान करतात. याचा परिचय असूनही पीएसआय तागड यांनी अमोल केंद्रे यांना मारहाण केली. तसेच सहकारी निकम यांचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन अंगावर ओळ फुटेपर्यंत बेदम मारहाण केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्रे यांच्यासह सहकाऱ्यांना पोलिसांची अमानुष मारहाण; पोलिसांविरोधात तीव्र संताप

दरम्यान, केंद्रे यांना झालेली मारहाण ही अत्यंत दुर्दैवी असल्याचे बोलले जात आहे. अमोल केंद्रे यांचा परिचय दिव्यात होणाऱ्या अन्यायावर आवाज उठविणे असा आहे. असाच प्रकार काल सोसायटीत काही इमारतीचा गेट बंद झाल्यावरुन घडला होता. झालेले आपापसातील भांडण मिटविण्यासाठी ते दिवा चौकी येथील पोलीस चौकीत आपल्या सहकाऱ्यांसमवेत गेले होते. अमोल गेल्या २८ मार्चपासून अन्नदान करीत असल्याने तसा अत्यावश्यक सेवेचा त्यांच्याकडे पासही होता.

त्यामुळे त्यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने कारवाई केली असल्याचेही म्हणता येणार नव्हते. परंतु त्यांच्या या समाजसेवेचा कल नसणाऱ्या अज्ञानी पोलिसांनी त्यांना मुद्दामहून मारहाण केली असल्याचे केंद्रे यांनी म्हटले आहे. यापाठीमागे कोणतातरी राजकीय व्यक्ती असावा अशी शक्यता आहे. म्हणून या मारहाणीची चौकशी व्हावी आणि पासधारक असूनही मारहाण का केली याची चौकशी करुन या पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत अमोल केंद्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर यांना ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.