मुंबई : ऑनलाईन मोबाईल गेमच्या माध्यमातून हिंदू तरुणांचे धर्मांतर करून ‘मोबाईल जिहाद’ पुकारणारा आरोपी शाहनवाज मकसूद खान याला रविवारी ठाणे पोलिसांनी अलिबाग येथून जेरबंद केले. त्याला आज न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ४०० मुलांचे मोबाईल गेम खेळण्याच्या बहाण्याने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाचे धागेदोरे आढळले होते. या पार्श्वभूमीवर गाझीयाबाद पोलिसांचे पथक शाहनवाज खान या आरोपीचा शोध घेत होते.
‘मोबाईल जिहाद’ : आरोपी शाहनवाजच्या चौकशीत, त्याची व पीडित मुलाची ओळख ही २०२१ च्या सुरुवातीस फोर्ट नाईट या गेमिंग या अॅप्लिकेशनवरून झाली असल्याचे समजले. गेम खेळताना एकमेकांशी बोलण्यासाठीच्या सुविधेमार्फत ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. नंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी हा गेम खेळणे बंद केले. त्यानंतर ‘वालोरंट’ हा नवा गेम डिसेंबर २०२१ अखेर खेळण्यास त्यांनी सुरुवात केली. हा गेम खेळत असताना ‘आईस बॉक्स’ या टार्गेटच्या ठिकाणी ते पोहोचले. तेव्हा दोघांमध्ये पहिल्यांदा धर्मांतर या विषयावर बोलणे झाले. झाकीर नाईक यानी केलेल्या भाषणावर ही चर्चा झाली होती.
धर्मांतराचे पुरावे दाखवा : आता आरोपीवर 400 मुलांचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे. अटक केलेला आरोपीने मुंब्रामध्ये चारशे धर्मांतर केले, याचा पुरावा दाखवा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. धर्मांतर एवढ्या प्रमाणात झाले असेल तर त्याचा आधी पुरावा दाखवा, अन्यथा फक्त शहराला बदनाम करू नका, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर पोलीस अधिकाऱ्यांनी 400 जणांचे धर्मांतर झाल्याची माहिती आमच्याकडे नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले.
हेही वाचा :
- Thane Crime News : 'मोबाईल जिहाद' मास्टर माईंड शाहनवाज पोलिसांच्या जाळ्यात, अलिबाग येथून अटक
- Solapur Crime News: सोलापूरमध्ये लव जिहादचा संशयावरून महाविद्यालयीन तरुणाला मारहाण; एका संशयितास अटक
- Religious Conversion: मोबाईल गेमिंगच्या सहाय्याने धर्मांतर प्रकरण; उत्तर प्रदेश गाझियाबाद पोलिस पोहोचले मुंब्रा पोलीस ठाण्यात