नवी मुंबई - बैलगाडीच्या शर्यतींची महाराष्ट्रात सुमारे चारशे वर्षांपूर्वीची परंपरा होती. मात्र, काही वर्षांपासून महाराष्ट्रात बैलांच्या शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी असूनही पनवेल तालुक्यातील दापोली गावात बैलगाडी शर्यतीचे विनापरवाना आयोजन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आयोजकांना व सहभागी व्यक्तींना अटक केले आहे.
बंदी असूनही बैलगाडी शर्यतीचे आयोजन -
बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रात बंदी असूनही शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. विना परवाना आयोजित केलेल्या या बैलगाडी शर्यतीमध्ये अनेकांनी सहभाग घेतला होता. याबाबत पनवेल शहर पोलिसांना माहिती मिळतान त्यांनी करावाई केली. पोलिसांनी आयोजक आणि सहभागी स्पर्धकांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील ४ आयोजक आणि ३ सहभागी स्पर्धकांना अटक करण्यात आले आहे. दोन बैलसुध्दा ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलीस घटनास्थळी येताच या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेकांनी बैलगाड्यांसह पळ काढला.
हेही वाचा - 'पवार कुटुंबावर टीका करूनच लोक मोठे होतात'