ETV Bharat / state

डोंबिवली एमआयडीसी पोस्ट ऑफिसमध्ये विषारी सापांचा सुळसुळाट; कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

author img

By

Published : Nov 29, 2019, 4:30 PM IST

डोंबिवली एमआयडीसी पोस्ट ऑफिसमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. मात्र, या पोस्ट ऑफिसच्या मागे कचऱ्याचे ढीग साठल्याने उंदीर, घुशी यांचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी पोस्ट ऑफिसच्या आवारात भक्ष्याच्या शोधात असलेल्या सापांचा वावर वाढला आहे.

Snake
पोस्ट ऑफिसच्या आवारात पकडलेला साप

ठाणे - डोंबिवली औद्योगिक विभागात उद्योजक आणि नागरिकांच्या सोईसाठी पेंढारकर कॉलेजच्या मागे एमआयडीसी पोस्ट ऑफिस आहे. या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. मात्र, या पोस्ट ऑफिसच्या मागे कचऱ्याचे ढीग साठल्याने उंदीर, घुशी यांचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी पोस्ट ऑफिसच्या आवारात भक्ष्याच्या शोधात असलेल्या सापांचा वावर वाढला आहे. हे साप पोस्ट ऑफिसचा आश्रय घेत असल्याने पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

डोंबिवली एमआयडीसी पोस्ट ऑफिसमध्ये विषारी सापांचा सुळसुळाट

पोस्ट ऑफिसच्या आवारात मोठे गवत, झाडी वाढलेली असून जुने सामान आणि कचराही पडलेला आहे. ऑफिसच्या बाजूच्या भूखंडावर व रस्त्याच्याकडेला कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. आत्तापर्यंत टेबलाच्या खणात, टेबल, कपाटाच्या खाली साप आढळले आहेत. पोस्ट ऑफिसचे दरवाजे, खिडक्यांना असलेल्या पोकळीतून उंदीर, साप कार्यालयात येत असावेत, अशी शंका आहे.

हेही वाचा - सत्ता पदांमध्ये फेरबदल; आता काँग्रेसचा उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीकडे विधानसभा अध्यक्षपद?

कार्यालयातील कर्मचारी किंवा कार्यालयात येणाऱ्या नागरिकांपैकी कुणाला साप चावल्याची अनुचित घटना घडली, तर याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न कर्मचारी वर्गाला पडला आहे. याच पोस्ट ऑफिसमध्ये भविष्यात पासपोर्ट कार्यालय होणार आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र, कोणतीही उपयोजना करण्यात आली नाही. एका महिला बचत गटाच्या एजंटने, पोस्ट मास्तर नसल्याचे सांगून तक्रार कुणाकडे करणार असा प्रश्न केला आहे. सापांच्या प्रश्नाबाबत डोंबिवली वेलफेअर असोसिएशनतर्फे पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱयांना विनंती करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले .

Intro:kit 319Body:
डोंबिवली पोस्ट ऑफिसमध्ये विषारी सापांचा वावर; कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

ठाणे : डोंबिवली ओद्योगिक विभागात उद्योजक ,व नागरिकांच्या सोईसाठी पेंढारकर कॉलेजच्या मागे एमआयडीसी पोस्ट ऑफिस आहे या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असतात, मात्र पोस्ट ऑफिसच्या मागे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठल्याने उंदीर ,घुशी यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे भक्ष्याच्या शोधात विषारी-बिन विषारी सापांचा वावर वाढला असून हे सर्व प्राणी आता पोस्ट ऑफिसचा आश्रय घेऊ लागल्याने पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
डोंबिवली एमआयडीसी पोस्ट कार्यालयाचा आतमध्ये मागील काही दिवसांपासून नाग, मण्यार इत्यादी जातीचे विषारी सर्प येत असून त्यामुळे येथील कर्मचारी वर्ग भयभहीत झाले आहेत. एक साप टेबलाच्या खणात बसलेला आढळला तर काही साप टेबल, कपाटाच्या खाली सापडत आहेत. पोस्टऑफिस आवारात मोठे गवत, झाडी वाढलेली असून जुने सामान, कचरा पडलेला आहे. पोस्टऑफिसच्या बाजूच्या भूखंडावर व रस्त्याचा कडेला कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. यामुळे येथे उंदीर, घुशीचे प्रमाण वाढल्याने पोस्टऑफिसचा दरवाजे, खिडक्यांच्या पोकळीतून उंदीर, साप येत असावेत अशी शंका आहे.
जर सर्प चावल्याची अनुचित घटना घडली तर याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न कर्मचारीवर्ग व येथे रोज कामांसाठी येणाऱ्या महिला बचत पोस्ट एजंट पुढे पडला आहे. याच पोस्टऑफिस मध्ये भविष्यात पासपोर्ट कार्यालय येणार आहे. कर्मचारी आपले नाव सागण्यास तयार नाहीत. मात्र वरिष्ठ अधिकाऱयांना वारंवार तक्रारी केल्या पण उपयोग होत नाही, तर एका महिला बचत एजंट ने मात्र इथे पोस्ट मास्तर नसल्याचे सांगून तक्रार कुणाकडे करणार असा सवाल केला आहे. पोस्ट ऑफिस मधील या प्रश्नाबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे म्हणाले डोंबिवली वेलफेअर असोसिएशन तर्फे पोस्टाच्या वरिष्ठ अधिकारी यांना विनंती करून लक्ष वेधणार आहे असे सांगितले .

Conclusion:dombiwali
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.