ETV Bharat / state

पीएमसी बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी, ठाण्यात खातेधारकाचा मृत्यू - pmc bank scam

पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की, नाही या चिंतेने आणखी एक बळी घेतला आहे.

एन्ड्रयू लोबो
author img

By

Published : Nov 5, 2019, 7:42 PM IST

ठाणे - पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की, नाही या चिंतेने आणखी एक बळी घेतला आहे. भिवंडी, कशेळी येथील 74 वर्षीय एन्ड्रयू लोबो या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारासाठी पीएमसी बँकेतून पैसे न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - भिवंडीत डेंग्यूचे ६ बळी, पालिका प्रशासन खळबळून जागे

पीएमसी बँकेच्या खातेदारांना पैसे काढण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेचे खातेदार अडचणीत सापडले आहेत. लोबो हे आपल्या पत्नीसह राहत होते, गेले काही दिवस ते आजारी होते. लोबो यांनी 35 लाख रुपयांच्या ठेवी पीएमसी बँकेत ठेवल्या होत्या. या ठेवींवरील मिळणाऱ्या व्याजावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. पीएमसी बँकेवरील निर्बंधांमुळे लोबो आणि त्यांची पत्नी पैसे कसे मिळणार आणि उपचार कसे करणार या विवंचनेत होते. पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे आत्तापर्यंत 8 खातेदारांचा मृत्यू झाला आहे.

Intro:Body:

पीएमसी बँक घोटाळ्याचा आणखी एक बळी गेला आहे.भिवंडी,कशेळी येथील ७४ वर्षीय ॲण्ड्रू लोबो या ज्येष्ठ नागरिकाचा पीएमसी बँकेतून उपचारासाठी पैसे न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. पीएमसी बँकेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे बँकेचे खातेदार अडचणीत सापडले आहेत. ॲण्ड्रु लोबो हे आपल्या पत्नीसह राहत होते. गेले काही दिवस ते आजारी होते. लोबो यांनी ३५ लाख रूपयांच्या ठेवी पीएमसी बँकेत ठेवल्या होत्या. या ठेवींवर मिळणा-या व्याजावरच त्यांचे जीवन अवलंबून होते.पीएमसी बँकेवरील निर्बंधांमुळे लोबो आणि त्यांची पत्नी पैसे कसे मिळणार आणि उपचार कसे करणार या विवंचनेत होते.पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे आत्तापर्यंत ८ खातेदारांचा मृत्यू झाला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.