ETV Bharat / state

Petrol Pump Employee Robbery : पिस्तूलचा धाक दाखवत पेट्रोल पंपच्या कर्मचाऱ्यांना लुटले; घटना CCTV कैद

author img

By

Published : May 13, 2022, 6:47 PM IST

Updated : May 13, 2022, 7:22 PM IST

मुंबई-नाशिक मार्गावर पडघा गावा नजीक डोहाले येथील जाई पेट्रोल पंप आहे. सात मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक सिल्व्हर रंगाची ऍक्टिवा मोटरसायकल वरून तीन अनोळखी लुटारु तोंडाला कपडा बांधून आले. त्यावेळी पेट्रोल पंपच्या पॉईंटवर कार्यरत कर्मचाऱ्यांना बंदूक सारखी दिसणारी वस्तु दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सर्व कर्मचारी घाबरले, तसेच एका कर्मचाऱ्याकडे असलेल्या पैसांच्या बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतल्या.

Petrol Pump Employee Robbery
Petrol Pump Employee Robbery

ठाणे - भिवंडी तालुक्यातील पडघा भागात असलेल्या एका पेट्रोल पंपावर काही अनोळखी लुटारूंनी पिस्तूल सारख्या दिसणारे हत्यार दाखवून कर्मचाऱ्यांकडे असलेल्या पैसांच्या बॅग आणि मोबाइल चोरून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलीसांनी अधिक तपास सुरू केला आहेत. मात्र पोलिसांच्या नोंदीत पिस्तूल ऐवजी लोखंडी पाईपा सारख्या वस्तु असे उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे ? हा लुटीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सीसीटीव्ही व्हिडिओ

जीवेठार मारण्याची धमकी देत लुटमारी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-नाशिक मार्गावर पडघा गावा नजीक डोहाले येथील जाई पेट्रोल पंप आहे. सात मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक सिल्व्हर रंगाची ऍक्टिवा मोटरसायकल वरून तीन अनोळखी लुटारु तोंडाला कपडा बांधून आले. त्यावेळी पेट्रोल पंपच्या पॉईंटवर कार्यरत कर्मचाऱ्यांना बंदूक सारखी दिसणारी वस्तु दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सर्व कर्मचारी घाबरले, तसेच एका कर्मचाऱ्याकडे असलेल्या पैसांच्या बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतल्या.

लुटारू व कर्मचाऱ्यांमध्ये झटापट : लुटारू व कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यावेळी इतर कर्मचारीही मदतीसाठी धावून आले. त्यांनाही बंदूक सारखी दिसणारी वस्तु दाखवून त्यांच्याकडे असलेली पैसेची बॅग आणि मोबाईल घेऊन चोरटे पडघ्याचे दिशेने पसार झाले. विशेष बाब म्हणजे सिल्व्हर रंगाची मोटरसायकल बिना नंबर प्लेटची होती. याबाबत तक्रारदार रामदास दत्तू जाधव यांचा तक्रारीनुसार पडघा पोलीस ठाण्यात कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - Electricity Theft Phalegaon : स्टोन क्रशरकडून तब्बल ५ कोटी ९३ लाखांची वीजचोरी; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

Last Updated : May 13, 2022, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.