ETV Bharat / state

Thane Crime : इमारतीत घुसून महिलेशी असभ्य वर्तन; विकृताला २४ तासात अटक - आरोपीला न्यायालयात हजर

Thane Crime: या प्रकाराने महिला प्रचंड घाबरली: सदरची पिडीत महिला दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी आपल्या मुलीसह इमारतीचे जिने चढून घरात प्रवेश करत असतांना वरच्या मजल्यावरून एक युवक अचानक खाली आला आणि त्याने सदर महिलेशी अत्यंत किळसवाणे गैरवर्तन केले आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने महिला प्रचंड घाबरली. परंतु काही क्षणातच तिने स्वतःला सावरले व त्या विकृताचा प्रतिकार करताच त्याने तिथून पळ काढला आहे. सदरचा संपूर्ण केळसपणा प्रकार हा तेथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Thane Crime
Thane Crime
author img

By

Published : Dec 10, 2022, 4:27 PM IST

ठाणे : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगर येथे एका युवकाने वृद्ध महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना ताजी असतानाच काल मुंब्रा येथे देखील असाच एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. मुंब्रा येथील अमृत नगर भागात असलेल्या दादी कॉलनी मधील इमारतीत राहणाऱ्या एका महिलेशी अत्यंत असभ्य वर्तन करण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या विकृताला २४ तासांत अटक

या प्रकाराने महिला प्रचंड घाबरली: सदरची पिडीत महिला दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी आपल्या मुलीसह इमारतीचे जिने चढून घरात प्रवेश करत असतांना वरच्या मजल्यावरून एक युवक अचानक खाली आला आणि त्याने सदर महिलेशी अत्यंत किळसवाणे गैरवर्तन केले आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने महिला प्रचंड घाबरली. परंतु काही क्षणातच तिने स्वतःला सावरले व त्या विकृताचा प्रतिकार करताच त्याने तिथून पळ काढला आहे. सदरचा संपूर्ण केळसपणा प्रकार हा तेथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती: त्याबाबत मुंब्रा पोलीस स्थानकात भादवी 354 आणि 354 D अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीला पकडण्यासाठी दोन तपास पथकांची नियुक्ती केली. Cctv आहे. फुटेज आणि तांत्रिक आधाराच्या मदतीने मुंब्रा पोलिसांनी १९ वर्षीय आकिब युसूफ काश्मिरी या विकृत आरोपीला केवळ 24 तासाच्या आत जेरबंद केले आहे. सदर आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुंब्रा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.