ठाणे - आता अनलॉक ४ झाल्यानंतर खाजगी नोकरी करत असलेल्या सर्व सामान्य नागरिकांना एसटी, रेल्वे, टीएमटीने प्रवास करावा लागत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वेमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, इतर सामन्यांना कामावर जाण्यासाठी एसटी, टीएमटी बसने प्रवास करावा लागत आहे.
आधी जो प्रवास करण्यासाठी नागरिकांना १ ते दीड तासाचा वेळ लागायचा. आता त्याच प्रवासाला ७ ते ८ तासांचा वेळ लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. मिशन बिगीनमध्ये सर्व वाहतूक व्यवस्था सुरू झाल्या असल्या तरी लोकल सेवा आवश्यक व्यक्तींनाच उपलब्ध आहे. अशा वेळी ट्रॅफिक जाम, रोडवरील खड्डेमय परिस्तिथी यामुळे प्रवाशी मेटाकुटीला आले आहेत. शिवाय, खर्चही वाढल्याने तूटपुंज्या पगारात घर चालवायचे तरी कसे? हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. शासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
अशा काळात नागरिकांना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
कोणत्याही वस्तूला हात लावताना काळजी घ्यावी आणि स्वयंशिस्ततेकडे नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. त्यानेच काही प्रमाणात कोरोनाला अटकाव करता येईल. या अडचणीच्या काळात एकीकडे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. पर्याय नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडावेच लागत आहे. अशा वेळी कोठेही हात लावताना आणि लावल्यानंतर सॅनिटायजेशन करणे, बाहेर पडल्यावर मास्क लावणे आणि शारीरिक स्वच्छता बाळगने हाच पर्याय असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'हे' आहेत प्रशासनाचे प्रयत्न
प्रशासन गर्दी होवू नये यासाठी प्रयत्न करत आहे. काही ठिकाणे सील करण्याची कारवाई देखील सुरू आहे. त्यासोबत मास्क न घालता फिरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड आकरला जात आहे. रुग्णालय आणि नॉन कोविड रुग्णालये सुरू असल्याने कोणत्याही रुग्णाला कोणतीही समस्या येवू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा- उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार; रस्ता रुंदीकरणात बाधित शाळेसाठी सहा कोटींचा निधी