नवी मुंबई (ठाणे) - आधार कार्ड असणे ही जीवनावश्यक बाब झाली आहे. जवळ आधार कार्ड नसेल तर नागरिकांना अनेक सेवा सुविधांना मुकावे लागते. एकीकडे आधार कार्ड असणे शासनाने अनिवार्य केले आहे. तर दुसरीकडे आधार केंद्रे ही शासकीय कार्यालयाच्या आवारातच कार्यरत असावी, असा नियम केला आहे. त्यामुळे शहरात व तालुक्यातील ठिकाणी शासकीय आवारात नसलेली आधार केंद्र ही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे उपलब्ध आधार केंद्रात गर्दी होत आहे. तसेच आधार केंद्र चालवणाऱ्या व्यक्तिंना व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
आधार कार्डचा उपयोग -
आधार कार्ड असणे हा प्रत्येक व्यक्तिंसाठी जीवनावश्यक बाब आहे. बँकचे खाते, कर्ज काढणे, शाळा प्रवेश, जीवनावश्यक योजनांचा लाभ, किंवा इतर शासकीय कामांसाठीही आधार कार्ड आवश्यक असते.
शासनाचा नवीन नियम -
नवी मुंबई शहरात आधार केंद्रे होती. मात्र, शासकीय आवारातच आधार केंद्रे असावी, असा नियम केल्यामुळे सद्यस्थितीत 23 आधार केंद्र असून त्यातील 7 केंद्र बंद करण्यात आली आहेत.
हेही वाचा - महागाईचा 'कळस': नऊ दिवसात पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महाग
नागरिकांची होतेय अडचण -
शासकीि कार्यालयाअंतर्गत आधार केंद्र असावे, या नियमामुळे आधार कार्ड काढण्यासाठी तसेच दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना फेऱ्या माराव्या लागतात. त्यात सर्व्हर डाऊन होणे, सायकांळी सहा वाजेनंतर वेबसाईटवर आधार कार्ड काढता न येणे, अशा समस्याही निर्माण होत आहेत.
नागरिकांची मागणी -
नवी मुंबईसह पनवेल, उरण तालुक्यात खेडेगावातील नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावात फेऱ्या माराव्या लागतात. वेळ वाया जातो. त्यामुळे जर शासनाने प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड अनिवार्य केले असेल तर आधार केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.