ETV Bharat / state

Makar Sankranti : तिळगुळ घ्या गोड गोड बोला: मकर संक्रांतीमुळे तिळगुळाच्या आकर्षक मिठाईने ठाण्यात बहरली दुकाने - तिळाच्या दारात २० टक्के वाढ

ठाण्याच्या बाजारात तिळगुळाच्या दुकानात मोठ्या प्रमाणात तिळगुळाच्या मिठाई दाखल झाल्या आहेत. मकर संक्रांतीला तिळाच्या लाडूंची मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यामुळे ठाण्यातील अनेक दुकाने मिठाईने सजली आहेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ही सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करत आहेत.

Makar Sankranti Festival At Thane
आकर्षक मिठाईने ठाण्यात बहरली दुकाने
author img

By

Published : Jan 13, 2023, 7:39 PM IST

ठाणे - मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात तिळगुळाचे लाडू, रेवड्या आदी मिष्ठान्नासोबत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ही सांस्कृतिक परंपरा आहे. मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू सारख्या महिलांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात तिळाच्या लाडूची विक्री होते. तर यंदाही बाजारात तिळगुळाचे लाडूने बाजी मारलेली आहे. तीळ महाग झालेले असले तरीही मागणी मात्र वाढलेलीच असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. ठाण्याच्या बाजारात तर आकर्षक मिठाईने दुकाने चांगलीच बहरली आहेत.

आकर्षक मिठाईने ठाण्यात बहरली दुकाने

हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी बाजार फुलाला नेहमीप्रमाणे मकर संक्रांती आणि हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी बाजार फुलाला आहे. तरीही प्रत्येक वर्षी बाजारात नवे काही तरी पाहायला आणि अनुभवण्यास मिळते. कोरोनानंतर बाजारात तीच परंपरा सुरु होती. यंदा मात्र दोन वर्षांनंतर संक्रांत आणि तिळगुळ सण मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. यंदा बाजारात तिळाच्या लाडू सोबतच नवी पर्वणी म्हणून तिळाचा पेढा, तिळाचा लाडू, तिळाची रेवडी, आणि तीळ ड्रायफ्रूट युक्त अशा मिठाई यंदा बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत.

पारंपरिक तिळगुळाची मागणी जोरात याशिवाय पारंपरिक तिळगुळाची मागणी कायम आहेच. मात्र यंदा तिळगुळही चांगल्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध असून याच आकर्षक विविध रंगाने सजलेल्या विविध आकाराच्या चित्राकृतीने नाविन्य आणण्यात आलेले आहे. हेच यंदाच्या बाजाराचे आकर्षण ठरलेले आहे. त्यामुळे नागरिक सध्या तिळगुळ घेण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत.

तिळाच्या रेवड्यांची मोठी मागणी मकर संक्रांती आणि हळदी कुंकामध्ये मोठ्या प्रमाणात तिळाचे लाडू आणि तिळाच्या रेवड्यांची मोठी मागणी असते. यंदाही त्यापेक्षा जास्त मागणी आहे. त्याशिवाय बाजारात तिळाचे पेढ्यांपासून ते अगदी आकर्षक पॅकिंगपर्यंत सर्वानाच मागणी आहे. यामुळे तिळाचे लाडू, पेढे, ड्रायफ्रुटमध्ये तीळ यांचा समावेश असल्याने मात्र तिळाचे भाव यंदा बाजारात तब्बल २० टक्क्याने वाढलेले आहेत. मकर संक्रांती सणाच्या तोंडावर तिळाची भाववाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ लागणार आहे. तिळाचे पदार्थ आवश्यक आहेत. त्यामुळे भाव न बघता याची खरेदी करावीच लागणार आहे.

तिळाच्या दारात २० टक्के वाढ मकर संक्राती या सणाचा आनंद दुगुणित व्हावा नागरिक प्रयत्न करतात. मात्र २० टक्के तिळाच्या दारात वाढ झालेली आहे. तरीही ठाण्यातील प्रसिद्ध मिठाई दुकान प्रशांत कॉर्नरमध्ये मात्र तिळाचे पदार्थ सणासाठी मागील वर्षीच्या दरानेच नागरिकांना पुरविले जात आहे. विविध प्रकारचे लाडू, रेवड्या आणि ड्रायफ्रूट तीळ मिठाई ही स्वस्तात उपलब्ध करून ग्राहकांचे हित प्रशांत कॉर्नर मिठाईच्या दुकान मालकाने जपल्याची माहिती प्रशांत कॉर्नर दुकानाचे व्यवस्थापक हरेश बोबडे यांनी दिली.

दोन वर्षानंतर उत्साहात साजरी होणार संक्रांती मागील दोन वर्षांमध्ये निर्बंध होते आणि या दीपावलीच्या सणापासून नागरिकांना सण उत्सव जोरात साजरे करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे दीपावली सणाप्रमाणेच यापुढील सर्व सण देखील उत्साहात आनंदात साजरे केले जातील, असे आवाहन सरकारने केल्याने नागरिकही जल्लोषात सण साजरा करण्यासाठी आयोजन करत आहेत. त्यामुळे व्यवसायावर महामारीचा परिणाम झालेला होता. यंदा मात्र मिठाईच्या दुकानदारांनी दरवाढीला बगल देत मागील वर्षाप्रमाणेच दर कायम ठेवल्याने नागरिकांमध्ये झुंबड उडालेली असल्याची माहिती प्रशांत कॉर्नर व्यवस्थापक हरेश बोबडे यांनी दिली आहे.

हे ही वाचा - Makar sankranti 2023 : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची आराधना केल्यास मिळतील हे लाभ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.