ETV Bharat / state

मीरा भाईंदरमधील आधार केंद्रावर सुरू आहे नागरिकांची फसवणूक; चौकशीचे आदेश - thane aadhar card center news

भाईंदर पूर्वेच्या सेव्हन इलेव्हन शाळेसमोरील आधार केंद्रात नागरिकांची फसवणूक सुरू असल्याचे समोर आले आहे. आता त्याची चौकशी होणार आहे.

people are deceived at the aadhaar center in mira bhayandar
मीरा भाईंदरमधील आधार केंद्रावर सुरू आहे नागरिकांची फसवणूक; तहसीलदारांनी दिले चौकशीचे आदेश
author img

By

Published : Nov 28, 2020, 4:37 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदर क्षेत्रातील आधारकार्ड केंद्राच्या भोंगळ कारभाराबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. भाईंदर पूर्वेच्या सेव्हन इलेव्हन शाळेसमोरील आधार केंद्रात महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची दलालाकडून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

सुशांत शेट्टी यांची प्रतिक्रिया
काय आहे प्रकरण -

सुरेश दर्गे नावाचा व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कार्यरत आहे. त्यांच्या गर्भवती पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी त्याला पैश्यांची गरज होती. रुग्णालयाच्या खर्चासाठी त्याने आपल्या पीएफ फंड मधून पैसे काढण्याचा निर्णय घेतला. दर्गे यांच्या सर्व कागदपत्रांवर वडिलांचे पूर्ण नाव होते. मात्र, आधार कार्डवर पूर्ण नाव नसल्याने ते आधार केंद्रावर दुरुस्त करण्याकरिता गेले. त्यावेळी केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी हे बदल करण्यासाठी एक शपथपत्र द्यावे लागेल, असे सांगितले. तसेच त्याच्याकडे या कामाकरिता 900 रुपयांची मागणी केली. मात्र, इतर कागदपत्रांवर वडिलांचे नाव असताना, आधार कार्डवर नावात दुरुस्त का करत नाही, असा प्रश्न त्याने विचारला असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणावरून या आधारकार्ड केंद्रावर कर्मचारी आणि दलाल यांच्यात साटंलोटं असून जनतेची दिशाभूल करत त्यांना लुटले जात असल्याचे समोर आले आहे.

आधार केंद्रावर दलाल सक्रिय -

आधार केंद्रात गेल्यानंतर सुरेश यांची मनोज अग्रवाल या व्यक्तीशी ओळख झाली. मनोजने सुरेश यांना शपथपत्रासाठी ९०० रुपये दिल्यास ताबडतोब नावातील बदल करून देतो, असे सांगितले. त्यानुसार आधार कार्ड केंद्रातील कर्मचाऱ्याला फोन करून सुरेश यांच्या नावात बदल करायच्या सूचना दिल्या. या घटनेची माहिती समाजसेवक सुशांत शेट्टी यांना मिळाली असता, त्यांनी थेट आधार केंद्रावर भेट दिली. त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. यावेळी सुशांत यांनी आधार केंद्रावरून फेसबुकवर लाईव्ह करून हे प्रकरण उघडकीस आणले. या संदर्भात उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, तहसीलदार यांनी चौकशी करून या आधार केंद्रावर कारवाईचे आदेश दिले आहे.

हेही वाचा - मालेगाव बॉम्बस्फोट : आरोपी कर्नल पुरोहितच्या दोषमुक्त याचिकेला उच्च न्यायालयात आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.